शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी : पृथ्वीराज चव्हाण 

शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी : पृथ्वीराज चव्हाण 

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी हेक्‍टरी किमान 25 हजाराची मदत शेतकऱ्याला मिळायला हवी होती तसे मात्र झाले नाही.राज्यात 92 लाख शेतकरी अवकाळी पावसाने बाधित झाले आहेत. 88 लाख हेक्‍टर शेतीचं नुकसान झालं आहे. राज्यपालांनी जास्तीची मदत देऊन दिलासा द्यावा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com