महिला आयोगाचे कार्यालय विभागीय स्तरांवर सुरू करणार - ठाकूर

राज्यात हिंगणघाटसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, महिला सुरक्षित रहाव्यात यासाठी राज्य सरकार विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून विभागीय स्तरावर राज्य महिला आयोगाचे कार्यालय सुरू करण्याबाबत त्वरीत कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
government will start state women comission offices at divisional level says yashomati thakur
government will start state women comission offices at divisional level says yashomati thakur

पुणे- राज्यात हिंगणघाटसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, महिला सुरक्षित रहाव्यात यासाठी राज्य सरकार विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून विभागीय स्तरावर राज्य महिला आयोगाचे कार्यालय सुरू करण्याबाबत त्वरीत कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. 

अॅड. ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की या कार्यालयांमुळे राज्यातील महिलांना राज्य महिला आयोगाशी संपर्क साधने सोयीचे होईल. महिला-बाल भवन प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या नियंत्रणाखाली महिला-बाल भवनमधील विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com