महापालिका स्वायत्त पण तक्रार आल्यास सरकार घालेल लक्ष : छगन भुजबळ 

मुंबई, पुण्यात मेट्रो ठीक आहे. पण आपण नागपूरमध्ये काय चालले आहे ते पाहतो आहे. मुळातच, मुंबईमधील 'स्कायवॉक'ला माझा विरोध होता. पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मुंबईत एखादा-दुसरा 'स्कॉयवॉक' वापरला जातो. बाकीचे रस्त्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. म्हणून विकास प्रकल्प राबवत असताना अभ्यास व्हायला हवा, असे मंत्री छगन भुजबळ यांनी येथे सांगितले
Chagan Bhujbal Says Government will interfere in Nashik Corporation Matters in Complaint Recieves
Chagan Bhujbal Says Government will interfere in Nashik Corporation Matters in Complaint Recieves

नाशिक :  जगभरातील सार्वजनिक वाहतूक तोट्यात आहे. अशा परिस्थितीत नाशिक मेट्रो आणि बससेवेचा इतर शहरांमधील अभ्यास करुन निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे, असा पुनरुच्चार करत ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिककरांवर कराचा बोजा टाकून चालणार नाही असे स्पष्ट केले. त्याचबरोबर महापालिका स्वायत्त आहे, परंतु तक्रार आल्यास त्याबाबत सरकार लक्ष घालेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

नाशिक मेट्रो रद्द केल्याने नाशिककरांचे नुकसान होईल, असे प्रतिउत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणून श्री. फडणवीस यांनी काम पाहिले असल्याने त्यांच्याकडे अधिक माहिती असेल, अशी खोपरखळी श्री. भुजबळ यांनी मारली. 

ते म्हणाले, "मुंबई, पुण्यात मेट्रो ठीक आहे. पण आपण नागपूरमध्ये काय चालले आहे ते पाहतो आहे. मुळातच, मुंबईमधील 'स्कायवॉक'ला माझा विरोध होता. पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मुंबईत एखादा-दुसरा 'स्कॉयवॉक' वापरला जातो. बाकीचे रस्त्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. म्हणून विकास प्रकल्प राबवत असताना अभ्यास व्हायला हवा. याशिवाय माझ्याशी बोलताना नगरसेवकांनी एस. टी. महामंडळाला दहा कोटी दिल्यास बससेवेसाठी ठेका देण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. बससेवा चालवण्यासाठी शंभर कोटी आणि महिन्याला पंधरा कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बससेवेबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करावा. केवळ कंत्राट काढण्यासाठी प्राधान्य देऊ नये.''

तीन चतुर्थांश कॅबिनेटमंत्री

''राज्यातील सत्तेत तीन पक्ष आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या समावेशबद्दल काही नाराज होणार, काही आनंदी असणार. पक्षाचे नेते सर्वांचे समाधान करु शकणार नाहीत. सर्वसाधारणपणे मंत्रीमंडळात निम्मे कॅबीनेट आणि निम्मे राज्यमंत्री असतात. आताच्या मंत्रीमंडळात तीन चतुर्थांश कॅबिनेट मंत्री असल्याने राज्यमंत्र्यांना एकापेक्षा अधिक खाते मिळतील. आमदार संग्राम थोपटे हे नाराज आहेत हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्‍न आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके नाराज होऊन राजीनामा देतो म्हणाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, कॅबीनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची समजूत काढली,'' अशी माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com