वारिस पठाण यांच्यावर कारवाई होणार - गृहमंत्री देशमुख

माजी आमदार वारीस पाठण यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
government take action against waris pathan says home minister anil deshmukh
government take action against waris pathan says home minister anil deshmukh

नागपूर - माजी आमदार वारीस पाठण यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
 
वारीस पठाण यांनी बंगळूरमधील सभेत बोलताना `आम्ही पंधरा कोटी संभर कोटींना भारी आहोत,' असे वक्तव्य केले होते. त्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर गृहमंत्री देशमुख बोलत होते. 

या वेळी गृहमंत्री म्हणाले, की नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी कोबिंग ऑपरेशनसाठी ड्रोन वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच ड्रोन खरेदी करण्यात येईल. 

अनिल देशमुख म्हणाले....
- CAA बाबत शरद पवार यांची भूमिका तीच आमची भूमिका.  तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेणार 

- कोणत्याही माणसाचं नागरिकत्व जाणार नाही हीच आमची भुमिका 

- भाजप स्वप्न पाहत होते सरकार येणार पण तसं झालं नाही, आमचं सरकार पाच वर्षे चालेल. भाजप मुंगेरीलालचे स्वप्न पाहताहेत

- लासलगावसारख्या महिलांवरील अन्यायाच्या अनेक घटना झाल्यात. आंध्रप्रदेशात दिशा कायद्याची माहिती घेतली, लवकर दिशासारखा कायदा करणार
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com