Government should stop Namaz on roads : Raj Thakray | Sarkarnama

आधी रस्त्यावरचे नमाज बंद करा मग गणपती थोड्या जागेत बसवायला सांगा : राज ठाकरे 

सरकारनामा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आम्ही काही करायचे म्हंटले की हे म्हणतात सायलेन्स झोन पाळा . मग मशिदीवरचे भोंगेही उतरवा . न्याय असेलच तर सर्व धर्माना समान हवा .

नवी मुंबई : " आता गणेश उत्सव आला की सरकारचे फर्मान सुटले - गणपती एवढ्याच जागेत बसवा . एवढ्याश्या जागेत बसवायचा तर कपाटातच बसवतो . हवाय कशाला सार्वजनिक गणेश उत्सव ? असे आदेश कुठून आणि कसे निघतात ? " असा प्रश्न महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत महा नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात  उपस्थित केला . 

राज ठाकरे म्हणाले , " गणेश उत्सव आला की असे आदेश काढता  कसे ? मग आधी रस्त्यावरचे नमाज बंद झाले पाहिजेत . आम्ही काही करायचे म्हंटले की हे म्हणतात सायलेन्स झोन पाळा . मग मशिदीवरचे भोंगेही उतरवा . न्याय असेलच तर सर्व धर्माना समान हवा . पूर्वी काँग्रेसच्या काळात हे घडत होते आता भाजपचे राज्य आहेतरी  हेच घडते आहे . तुम्हाला हव्या त्या गोष्टी कोर्टाकडून करून घेता आणि ज्या तुम्हाला नको आहेत त्या कोर्टाला नाकारायला लावता .  कोर्ट असो की निवडणूक आयोग असो माझे  हात जोडून सांगणे आहे की स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवा . कोणत्याही सरकारच्या नदी लागू नका . "

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख