सरसकट कर्जमाफीचा कार्यक्रम जाहीर करा - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणाचा आणि सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला आहे. या कर्जमाफीचा कार्यक्रम सरकारने जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
सरसकट कर्जमाफीचा कार्यक्रम जाहीर करा - देवेंद्र फडणवीस

पुणे - महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणाचा आणि सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला आहे. या कर्जमाफीचा कार्यक्रम सरकारने जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. 

नागपूर येथे उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आज फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की सरसकट कर्जमाफीची जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून केलेली नाही. सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करून देत आहे. या सरकारला शेतकऱ्यांना विसर पडू नये. शेतकऱ्यांसंदर्भात आतापर्यंत एकही निर्णय झालेला नाही. 

सरकार सत्तेवर आल्यावर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. आमचे काळजीवाहू सरकार असताना या शेतकऱ्यांना दहा हजार कोटींच्या मदतीची मान्यता दिली होती. नियमित सरकार आल्यानंतर ही मदत वाढवली जाईल असेही सांगितले होते. राज्यपालांनी हेक्टरी आठ हजार आणि बागायतीसाठी 18 हजार रुपयांची मदत जाहीर केली. अद्याप त्याचा निर्णय झाला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे सरकारने शब्द पाळावा आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 23 हजार रुपये मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com