फोन टॅपिंग चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती - अनिल देशमुख

विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारीवरुन चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सर्व प्रमुख शहरांमध्ये मोठ्या ईमारतींवर सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज म्हणाले.
government set up committee to inquiry of phone tappine says anil deshmukh
government set up committee to inquiry of phone tappine says anil deshmukh

नागपूर ः विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारीवरुन चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सर्व प्रमुख शहरांमध्ये मोठ्या ईमारतींवर सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज म्हणाले.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, की सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावरुन दोन सदस्यीय समिती नियुक्त करुन चौकशी सुरु करण्यात आली. चौकशी दरम्यान भाजपच्या काही नेत्यांचेही फोन टॅपींग झाल्याची माहिती मिळाली. एकनाथ खडसेंचा फोन टॅप झाल्याचीही माहीती आहे. या समितीच्या अहवालानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात येईल. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. मुंबई शहरात पाच हजार कॅमेरे आहेत. ही संख्या वाढवून 10 हजार करण्यात येणार आहे. 

बांधकामाच्या नियमांत बदल करुन प्रत्येक ईमारतीवर सीसी टीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा करणार आहे. राज्याच्या प्रत्येक शहरातील मुख्य ईमारतींवर कॅमेरे लावल्यास पोलीसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com