कोरोनाशी लढण्यासाठी आमदार निधीतील 50 लाख वापरण्यास परवानगी

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करू लागला आहे. पण अनेक ठिकाणी वैद्यकीय यंत्रसामुग्री अपुरी पडत आहे. शासनाच्या हे लक्षात आल्यानंतर आता आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातील निधी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात प्रत्येक आमदाराला ५० लाखाचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्यात येणारआहे. यातून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करता येणार आहे. यात प्रामुख्याने कोरोना टेस्टिंग किटसह इतर साहित्याचा समावेश आहे.
Government sanctions 50 lakh to each mla to fight cororavirus
Government sanctions 50 lakh to each mla to fight cororavirus

लातूरः कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करू लागला आहे. पण अनेक ठिकाणी वैद्यकीय यंत्रसामुग्री अपुरी पडत आहे. शासनाच्या हे लक्षात आल्यानंतर आता आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातील निधी वापरण्यास परवानगी देण्यात आली  आहे. यात प्रत्येक आमदाराला ५० लाखाचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार
आहे. यातून  वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करता येणार आहे. यात प्रामुख्याने कोरोना टेस्टिंग किटसह इतर साहित्याचा समावेश आहे.

राज्यात कोरोना कोव्हीड १९ विषाणुमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. देश, राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात उपाय योजना केल्या जात आहेत. आरोग्य विभाग युद्ध पातळीवर काम करीत आहे. पण स्थानिक पातळीवर वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य अपुरे पडत असल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. आता शासनाने आमदार निधीतून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य
खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणून ५० लाख रुपयापर्यंत निधी एक वेळची विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या निधीतून इनफ्रारेड थर्मामिटर, पर्सनल प्रोटक्शन इक्वीपमेंटस किटस, कोरोना टेस्टिंग किटस, आयसीयु व्हेंटीलेटर व आयसोलेशन वॉर्ड, क्वॉरटाईन वॉर्ड व्यवस्था, वैद्यकीय कर्मचाऱयाकरीता फेस मास्क, ग्लोव्हज, सॅऩिटायझर, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व औषधी द्रव्ये विभागाने कोव्हीड १९ या विषाणुमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना प्रमाणित केलेले इतर तत्सम वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, मुख्याधिकारी यांना ही वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करता येणार आहे. पण या करीता संबंधीत आमदारांनी शिफारस केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर हे साहित्य खरेदी करता येणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com