आंबेडकर स्मारकाच्या नावाने सरकार राजकारण करतय  - सचिन अहिर - Government is politicizing Dr. Babasaheb Ambedkar memorial - Sachin Aher | Politics Marathi News - Sarkarnama

आंबेडकर स्मारकाच्या नावाने सरकार राजकारण करतय  - सचिन अहिर

प्रशांत बारसिंग :सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई  :  दादरमधील इंदू मिलच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात भाजप-शिवसेना युतीचे सरकार राजकारण करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी  बुधवारी केली. 

मुंबई  :  दादरमधील इंदू मिलच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात भाजप-शिवसेना युतीचे सरकार राजकारण करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी  बुधवारी केली. 

डॉ. आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन होऊन तब्बल दोन वर्षे उलटून गेली, तरीही अजून स्मारकाची एक वीटही रचली गेलेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. अहिर यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. 

इंदू मिल परिसरात डॉ. आंबेडकरांचे भव्य-दिव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी आंबेडकरांच्या तमाम अनुयायांची इच्छा आहे. या स्मारकाकडे अवघ्या देशभरातील नागरिक डोळे लावून बसले असताना केंद्र आणि राज्य सरकार मात्र त्यांच्या भावनांशी खेळत आहे. स्मारकाच्या मुद्द्याचा निव्वळ राजकारणासाठी वापर करुन हे सरकार आता स्वस्थ बसून आहे, अशी टीका अहिर यांनी केली.

 महिनाभरात स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल, असे आश्‍वासन राज्य सरकारच्या वतीने यंदाही देण्यात आले आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता तारखा देण्याव्यतिरिक्त या सरकारने काहीच केलेले नाही, असेही ते म्हणाले. 
  
कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले. त्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ उलटला तरी अजून एक वीटही रचली गेलेली नाही. बिहारमधील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आंबेडकरी अनुयायांची दिशाभूल करण्यासाठी हे भूमिपूजन करण्यात आले होते.

 या कामासाठी निविदाही मागवलेल्या नसताना पंतप्रधानांसारख्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने असे भूमिपूजन करणे खरेच खेदजनक आहे. हासुद्धा बिहारच्या निवडणुकीसाठी एक "चुनावी जुमला' होता, असा टोला निरुपम यांनी लगावला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख