Government opposes Arun Gavli"s bail | Sarkarnama

अरूण गवळीच्या फर्लोला सरकारचा विरोध 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 मार्च 2017

नागपूर:गुंड अरूण गवळीला संचित रजा (फर्लो) देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. राज्य सरकारने न्यायालयीन प्रकरणाचा हवाला देऊन फर्लोला संमती देण्यास राज्य सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्र सादर करून असमर्थता व्यक्त केली.

 अरुण गवळी खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या आरोपाखाली तो नागपुरात मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी या मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी महापालिकेत भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अरुण गवळीच्या फर्लोला राज्य सरकारची संमती मिळेल, असे वाटत होते. अरुण गवळीने फर्लोसाठी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी नागपूर खंडपीठात सुरू आहे. यावेळी राज्य सरकारतर्फे शपथपत्रात गवळीच्या फर्लोला विरोध केला. गवळीने मुंबई उच्च न्यायालयात याआधीच फर्लोसाठी अर्ज केला आहे. या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे कारण पुढे करून राज्य सरकारने फर्लो मंजूर करण्यास संमती दिलेली नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख