शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती मागवली

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र,25 हजारा पेक्षा जास्त वेतन असलेल्या सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे
Government Officials Salary Information Sought by Government
Government Officials Salary Information Sought by Government

मुंबई : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 25 हजार पेक्षा जास्त वेतन असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. त्यामुळे राज्याच्या सहकार व पणन विभागाने सर्व सरकारी - निम सरकारी कर्मचाऱ्यांची नावे, वेतन श्रेणींची यादी आधार कार्ड सह पाठविण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत. त्यामुळे एका क्‍लिक वर निकषात न बसणारा शेतकरी ओळखता येणार आहे.

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र,25 हजारा पेक्षा जास्त वेतन असलेल्या सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.चतुर्थ श्रेणी वगळून सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या कर्जाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे चतुर्थ श्रेणी वगळून 25 हजार पेक्षा जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पाठविण्याचे पत्र सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्‍ला यांनी सर्व सरकारी, निमसरकारी विभाग, उद्योग, महामंडळे यांना पाठवले आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरुन घेण्यात येणार नाही. त्यामुळे संगणक प्रणाली व्दारे लाभार्थी ठरवताना या यादीचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी ही यादी मागविण्यात आली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. बॅंकांकडे प्रत्येक कर्जदाराचा आधार क्रमांक असतो. तर ,सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्याचा आधार क्रमांक घेतला जाणार असल्याने 

आजी-माजी आमदार खासदार अपात्र

या कर्जमाफी योजनेत सरकारकडून 25 हजार वेतन मिळणारी कोणतीही व्यक्ती पात्र ठरणार नाही. त्यामुळे विद्यमान आमदार खासदारांसह माजी आमदार खासदारही या योजनेतून वगळण्यता आले आहेत, असे आभा शुक्‍ला यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com