....म्हणून सरकारी कार्यालयांमध्ये १५ मिनिटे पसरली होती आनंदाची 'साथ'

मंगळवारी कार्यालय सोडताना एकमेकांचा निरोप घेण्याचा 'सोहळा'ही काही ठिकाणी रंगला. आता पुन्हा आठवडाभराने भेटू, असे म्हणत अनेकांनी कार्यालय सोडले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची आनंदाची साथअल्पकालीनच ठरली
Government Officials Disappointed due to Cm's Announcement about Holiday
Government Officials Disappointed due to Cm's Announcement about Holiday

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. बैठक सुरू असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील सात दिवस सरकारी कार्यालये बंद राहतील, अशा बातम्या वृत्तवाहिनीवर झळकू लागल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. सात दिवसांची सक्तीची सुटी मिळणार असल्याने सरकारी कर्मचारी खूश झाले. 

मंगळवारी कार्यालय सोडताना एकमेकांचा निरोप घेण्याचा 'सोहळा'ही काही ठिकाणी रंगला. आता पुन्हा आठवडाभराने भेटू, असे म्हणत अनेकांनी कार्यालय सोडले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची आनंदाची 'साथ' अल्पकालीनच ठरली. बैठकीनंतर सरकारी कार्यालये सात बंद राहणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केल्याने त्यांचा हिरमोड झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने अनेकांचा आनंद क्षणिक ठरला.

जगभर थैमान माजलेल्या कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सरकारी कार्यालये सुरूच आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे रेल्वे आणि बेस्ट सेवा सुरू आहे . मात्र आवश्‍यकता वाटली तर पुढील काळात सरकारी कार्यालये तसेच सार्वजनिक सेवा नाईलाजाने बंद कराव्या लागतील. राज्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले

राज्यात कोरोना विषाणू बाधीतांची संख्या 41 झाली आहे. राज्यातील पहिल्या रुग्णाचा मृत्यु झाला असून आणखी एक रुग्ण गंभीर आहे. त्यामूळे सध्यातरी नागरिकांनी गर्दी करू नये, अनावश्‍यक प्रवास टाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, नागरिकांची गर्दी वाढल्यास एसटी आणि रेल्वे सेवा बंद करण्याचे कठोर पाऊले उचलावी लागतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मंगळवारी (ता. १७)राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये एसटी, रेल्वे सेवा बंद करण्याच्या निर्णयावर चर्चा झाली. 

दरम्यान एसटी, रेल्वे ही सेवा नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची सेवा आहे. त्यामूळे सध्यातरी एसटी आणि रेल्वे सेवा बंद करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. राज्यावर आलेले हे संकट परतवण्यासाठी नागरिकांनी स्वयमस्फूर्तीने नियम पाळण्याची गरज आहे. त्यामूळे कोरोना विषाणूचा धोका टळू शकतो. तर कामाशिवाय घरा बाहेर पडु नये असे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com