पंतप्रधान येताहेत मुख्यालय सोडू नका : शासकीय अधिकाऱ्यांना फर्मान 

ऑरीकच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7 सप्टेंबर रोजी उद्‌घाटन होणार आहे.
narendra_modi.
narendra_modi.

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई कॉरिडरच्या अंतर्गत देशात तयार होणारी पहिली स्मार्ट सिटी असलेल्या ऑरीकच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7 सप्टेंबर रोजी उद्‌घाटन होणार आहे. मोदींच्या दौऱ्या निमित्ताने शासकीय अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत. 

आता पर्यंत ऑरीक सिटीत 3600 कोटीची गुंतवणुक आली आहे. 55 जणांनी ऑरीक सिटीत प्लॉट घेतले आहेत. ऑरीकचे भव्य हॉलचे कामही पुर्ण झाले असून इतर कामेही युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ऑरीक मध्ये गुंतवणुक येणे सुरु झाली आहेत. देशातील महत्वपुर्ण प्रकल्पाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी औरंगाबादेत येत आहे. यापुर्वी केवळ निवडणुकीच्या प्रचारसाठीच नरेंद्र मोदी औरंगाबादेत आले होते. 

ऑरीक सिटीचा पहिला टप्प्याचे उद्‌घाटन आणि महिला बचत गटाचा कार्यक्रमास नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. महिला बचत गटांच्या मेळाव्यास एक लाख महिलांचा उपस्थिती राहणार आहे. या महिलांना नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंब व महिला सक्षमीकरण कमांची दखल केंद्र सरकारन घेणार आहे. 

दरम्यान पंतप्रधान जिल्ह्यात येणार असल्यामूळे जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान जिल्ह्यांत येत असल्यामूळे शासकीय कार्यालयाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेश पाठविले आहेत. तर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खाते प्रमुख, गट विकास अधिकारी आणिक र्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नयेत तसेच रजेचा अर्ज सादर करून नयेत असे आदेश पत्राव्दारे दिले आहेत. पंतप्रधान येणार आहे.त्यातच गौरी-गणपती उत्सव असल्यामूळे अनेकांना सुट्टी घेता येणार नाही.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com