मुंबई मेट्रोच्या प्रमुख अश्विनी भिडे यांची कोंडी होणार ?  

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिली होती. आता त्यांनी आरेतील वृक्ष कत्तलीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Is Metro woman ashwini bhide facing problems ?
Is Metro woman ashwini bhide facing problems ?

मुंबई : कुलाबा- वांद्रे- सिप्झ मेट्रो मार्गाच्या कारशेडसाठी आरेतील झाडे कापण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने मुंबई मेट्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर आश्विनी भिडे यांची कोंडी होणार का याबाबत मंत्रालयात चर्चा आहे. 


 पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध झुगारून झाडे कापण्यात आल्याने मोठा जनक्षोभ उसळला होता. शिवसेनेने या विरोधात आवाज उठवला होता. आदित्य ठाकरे यांनी तर अश्विनी भिडे यांच्या बदलीची मागणी केली होती . उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिली होती. आता त्यांनी आरेतील वृक्ष कत्तलीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चौकशीसाठी अर्थ विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीला आपला अहवाल 15 दिवसांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या अहवालात वृक्षतोड आवश्यकता नसताना करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला तर ही बाब अश्विनी जोशी यांना अडचणीची ठरू शकते. 


मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी सद्यःस्थितीत निश्‍चित केलेल्या जागेऐवजी पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आणि वाजवी किमतीत पर्यायी जागा उपलब्ध आहे किंवा कसे? मेट्रो कारशेडसाठी आरेतील 2 हजार 100 झाडांची कापणी करण्यापूर्वी विहित पद्धतीचा अवलंब केला होता का? आरे कॉलनीतील जमिनीच्या पर्यावरण रक्षणासाठी काय उपाययोजना करणे आवश्‍यक आहे? याबाबत ही समिती चौकशी करेल. चौकशी समितीच्या अहवालावर अश्विनी भिडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राज्यकर्ते ठरवतील . 


नगरविकास विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन आदेश जारी केला. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. कार्पोरेशनचा हा निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरला होता. निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, तरीही कारशेडसाठी कार्पोरेशनने एका रात्रीत आरेतील झाडांची कत्तल केली होती.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com