government help to keral because congress pressure | Sarkarnama

केरळला मदत म्हणजे "देर आये दुरुस्त आये' : सचिन सावंत 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई :  राज्य सरकारला आपल्या जबाबदारीची व परंपरेची जाणिव करून देत कॉंग्रेस पक्षाने केरळला राज्यामार्फत तात्काळ मदतीची मागणी केली यावर का कू करत का होईना राज्य सरकारने केरळ सरकारला मदत जाहीर केली. याबद्दल देर आये दुरुस्त आये असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केरळ सरकारने दोन हजार कोटी रूपयांच्या मदतीची मागणी केंद्र सरकारकडे केली होती परंतु केंद्र सरकारने केवळ 600 कोटींची मदत देत हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. केरळला मदत करण्यासाठी अनेक राज्ये पुढे आली असताना तेलंगणासारख्या मागास राज्यानेदेखील 25 कोटींची मदत जाहीर केली आहे. पंजाब व कर्नाटक सरकारनेही प्रत्येकी 10 कोटी रूपयांची मदत दिली आहे. बिहार, ओरिसा सारखी मागास राज्ये देखील मदतीकरता पुढे येत असताना महाराष्ट्र राज्याने बघ्याची भूमिका घेणे अतिशय दुर्देवी होते. 

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या राज्यांना मदत करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे याची आठवण करून देत कॉंग्रेसने तात्काळ मदतीची मागणी केली. परंतु सुरुवातीला सरकारने केवळ पाच कोटी रूपयांची मदत जाहीर केली पण यावर टीका होईल या भितीने मदतीच्या रकमेत वाढ करून ती वीस कोटी रूपये करण्यात आली. तेलंगाणासारखे मागास राज्य 25 कोटींची मदत जाहीर करत असताना सरकारने जाहीर केलेली मदत महाराष्ट्राला साजेशी नाही असे सावंत म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख