government gr | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

सेवेत असताना मृत्यू झाल्यास 10 लाख ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 सप्टेंबर 2018

मुंबई : राज्य सरकारच्या कायद्यानुसार 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास सरकारतर्फे त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय सरकारने घेतला. 

2005 नंतर सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन योजनेऐवजी अंशदान पेन्शन योजना लागू होते. त्यामुळे सरकारी नोकरदारांना निवृत्तिवेतन तुटपुंजे मिळते. तसेच, त्यांचे अकाली निधन झाले तरी त्यांच्या कुटुंबीयांनाही फारशी सरकारी नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे कामाला लागून 10 वर्षांच्या आत निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना किंवा वारसाला 10 लाखांची भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

हा निर्णय सरकारसह जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानित बिगर सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख