शरद पवार साहेबांच्या जिद्दीनेच राज्यात सरकार आले : आदिती तटकरे

राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते वसंतराव ओसवाल यांच्या कार्यालयात पार पडलेल्या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आदिती तटकरे यांनी वसंतराव ओसवाल यांचे आशिर्वाद घेतले.
aditi-tatkare
aditi-tatkare

पाली :  नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या राज्यमंत्रिमंडळात अनपेक्षीतपणे मंत्रीपदाची संधी मिळाली. मंत्रिमंडळात मिळालेल्या या संधीद्वारे जनतेची सेवा व जिल्हयाचा सर्वांगिण व शास्वत विकास साधण्यावर भर देणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. गुरुवारी (ता. 2) पालीत आदिती तटकरे यांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला . त्यावेळी तटकरे बोलत होत्या.

आदिती तटकरे यांनी पालीत छत्रपती  शिवाजी महाराज स्मारकात जाऊन महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते वसंतराव ओसवाल यांच्या कार्यालयात पार पडलेल्या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित 
होते. यावेळी आदिती तटकरे यांनी वसंतराव ओसवाल यांचे आशिर्वाद घेतले. 

आदिती तटकरे म्हणाल्या की पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांच्या सक्षम नेतृत्वात व खा.सुनिल तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. व जनतेने अतुट प्रेम देत मोठ्या विश्वासाने प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. त्यावेळेस वाटले नव्हते की राज्यात नवी समिकरणे जुळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तास्थानी विराजमान होईल व काम करण्याची संधी मिळेल. परंतू राज्यात शरद पवार साहेबांच्या जिद्दीने   कुशल नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. 

खा. सुनिल तटकरे यांनी आजवर मंत्रीमंडळात विविध महत्वाच्या पदांवर प्रभाविपणे काम केले. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासात्मक व लोकाभिमुख काम केले. हे कामकाज मी जवळून पाहिले आहे. तसेच जिल्हापरिषदेच्या कार्यकाळात प्रशासन आणि संघटना याचा प्रचंड अनुभव मिळाला. ज्यावेळेस राज्यात आपली सत्ता नसते व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ता असते. त्यावेळेस अनेकदा कामे करण्यास अडसर निर्माण होत असतो.

राजकीय समिकरणे सातत्याने बदलत असतात. परंतू ज्यावेळेस व्यापक दृष्टीकोन  मनात ठेवून लोकहितासाठी सत्ता स्थापन होते. त्यावेळेस मिळालेल्या संधीद्वारे जनतेचे अधिकाधिक प्रश्न व समस्या सोडविण्यावर भर दिला जातो. आजमितीस राज्यात आपले सरकार सत्तेत असल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणून विकास कामे करण्यावर भर दिला जाणार असल्याचे तटकरे यावेळी म्हणाल्या.  

यावेळी जि.प सदस्य सुरेश खैरे, पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, रा.कॉ. पक्षाचे सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, जे.बी, गोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुधागड तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, पाली शहर अध्यक्ष अभिजीत चांदोरकर, प्रकाश कारखानिस, किसनराव उमठे, दिपक पवार, बाळ मराठे, माजी सभापती साक्षी दिघे, सुनिल राउत, उत्तमराव देशमुख, सुलतान बेणसेकर, किरण खंडागळे, सागर मिसाळ, इम्प्तीयाज पठाण, आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com