Government employees to get seventh Pay commisison from Deewali | Sarkarnama

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ;सातवा वेतन आयोग दिवाळीत

सरकारनामा
गुरुवार, 19 जुलै 2018

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळी सातवा वेतन आयोग देण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे.

नागपूर :  राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळी सातवा वेतन आयोग देण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे. याकरिता आर्थिक नियोजन केले जात असून सरकारच्या तिजोरीवर 21 हजार 530 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. तो राज्यातील कर्मचाऱ्यांनाही दिला जाणार आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांनाही लाभ दिले जाणार असून अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करताना थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा केली जाणार असल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख