कुपोषणावर आता टिव्ही मालिकांचा इलाज; महिला व बालकल्याण विभागाची शक्‍कल 

राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि उपजत मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून गरोदर मातांना संगोपनाची माहिती दिली जाणार आहे.
Government will Educate Pregnant Women Through TV Serials
Government will Educate Pregnant Women Through TV Serials

सोलापूर  : राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि उपजत मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून गरोदर मातांना संगोपनाची माहिती दिली जाणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला असून त्यासाठी सुमारे 50 कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे. एप्रिलपासून या नव्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे.

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागासह सरकारने कुपोषण कमी करणे, माता, बाल मृत्यू कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी हजारो कोटींचा खर्चही केला, मात्र म्हणावे तितके कुपोषण कमी झालेले नाही. दरम्यान, ग्रामीण असो की शहरी भागातील गरोदर महिला, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, तरुण रात्रीच्या वेळी तथा निवांतवेळी दूरचित्रवाणीवरील मालिका पाहतात. बहूतेक महिला मालिकेतील नायिकेचे अनुकरण करतात, असे निरीक्षण महिला व बालकल्याण विभागाने नोंदवले. 

त्यानुसार आता दूरचित्रवाणीवरील मराठी व हिंदी मालिकांच्या माध्यमातून गरोदर महिलांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी, एक हजार दिवस मुलांचे संगोपन कसे करायचे, सहा महिन्यांपर्यंत बालकांचे स्तनपान याची माहिती दिली जाणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याला मान्यता दिली आहे. त्यानुसार हिंदी व मराठी मालिकांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांना मार्चमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्य कुपोषणमुक्‍त करणे, राज्यातील माता व बालमृत्यू कमी करण्याच्या हेतूने आता दूरचित्रवाणीवरील मराठी व हिंदी मालिकांच्या माध्यमातून गरोदर मातांना संगोपनाची माहिती (मेसेज) दिली जाणार आहे. एप्रिलपासून दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये बदल दिसून येईल. - जामसिंग गिरसे, उपायुक्‍त, आरोग्य व कुपोषण, मुंबई

ठळक बाबी...

- राज्यातील कुपोषण कमी करुन बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी नवा प्रयोग
- मार्चमध्ये मराठी व हिंदी मालिकांच्या लेखकांना दिले जाणार प्रशिक्षण
- एप्रिलपासून सरकारच्या निर्देशानुसार दूरचित्रणावरील मालिकांमध्ये दिसणार बदल
- महिला व बालकल्याण विभागाच्या नव्या प्रयोगासाठी होणार सुमारे 50 कोटींपर्यंत खर्च

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com