सरकारकडून धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट - राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही, हे पाप केंद्र सरकारचे आहे. 1995 च्या जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम कायदा थेट भुकेशी जोडला गेला. त्यामुळे बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला मिळाला. त्यामुळे मधले दलाल शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
government cheats farmers through policy says raju shetti
government cheats farmers through policy says raju shetti

नाशिक : शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही, हे पाप केंद्र सरकारचे आहे. 1995 च्या जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम कायदा थेट भुकेशी जोडला गेला. त्यामुळे बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला मिळाला. त्यामुळे मधले दलाल शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.21) केला.

पांडाणे (ता. दिंडोरी) येथे ज्ञानगंगा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी झाला. यावेळी "सकाळ' च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने व कवी प्रा. संदीप जगताप यांनी श्री. शेट्टी यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.

श्री. शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांना लुटणारे व्यापारी सावकार हे आहतेच, मात्र त्यापेक्षा मोठे लुटारू मुंबई व दिल्लीत आहेत. शेतकरी त्यांना बळी पडतात, हे शेतकऱ्याने समजून घेतले पाहिजे. तोडक-मोडका हमीभाव जाहीर होतो, तोही शेतकऱ्यांना मिळत नाही, असा घणाघात त्यांनी सरकारवर केला. शेतकऱ्याच्या घामाच्या दामासाठी आता केंद्राच्या धोरणांची गरज आहे. त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वतंत्र लॉबीची गरज आहे. अर्थवादी भूमिकेतून काम उभे राहावे, नाहीतर तोपर्यंत फसवणूक होत राहणार, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

चळवळीत काम करताना निराश होऊ नका, एकत्र होऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा, शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांशी दोन हात करू अन प्रश्न सोडवू, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी सरकारमधून बाहेर का पडलात यावर श्री.शेट्टी यांनी सविस्तरपणे सांगितले. 2013 साली गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाला बळी पडलो. शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवणूक करण्याची खात्री मिळाल्याने मी सत्ताधाऱ्यांसोबत सहभागी झालो. मोदींवर विश्वास ठेवला, मात्र भलतंच घडलं, अजेंडे अन सांप्रदायिक विचार समोर ठेऊन भाजपने कामावर भर, त्यामुळे मी सत्तेला लाथ मारल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे "दगडापेक्षा वीट मऊ' या अर्थाने सहभागी झालो. तेथेही घोषणांची अंमलबजावणी होताना दिसले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भूमिकेवर ठाम राहून काम करत राहणार असे आवर्जून सांगितले.

मुलाखतकार श्री. माने यांनी शेतकरी चळवळीची स्थिती, केंद्राच्या व राज्याच्या सत्तेतून घेतलेली फारकत, "राजकीय सत्तासंघर्ष ते कॉलेज जीवनाच्या आठवणी' यावर श्री. शेट्टी यांना बोलते केले. उपस्थितांनी त्यास भरभरून दाद दिली.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती देशमुख, सहाय्यक निरीक्षक चव्हाण, स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, आयोजक व संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव, सचिव सचिन कड यांची यावेळी उपस्थिती होती.

ऐतिहासिक महिला अधिवेशनाला उजाळा
चांदवड येथे 1986 साली शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने ऐतिहासिक महिला अधिवेशन पार पडले होते. यात शाहीर अमर शेख यांचे "डोंगरी शेत माझं, मी बेनू किती' हे गीत एक लाख उपस्थित महिलांनी गायले होते. याची आठवण निघताच उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com