government | Sarkarnama

सरकारला तूर खरेदीचे निर्देश द्यावेत, न्यायालयात याचिका

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

औरंगाबाद ः मराठवाड्यासह राज्यातील शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्याच्या तूर खरेदीचे निर्देश सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यावर येत्या 2 मे रोजी सुनावणी होणार आहे. मराठवाड्यातील तूर खरेदी केंद्रांवर 4 लाख 60 हजार क्विंटल एवढ्या तुरीची नोंदणी झाल्यावरही 5 ते 7 लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांकडे शिल्लक राहते. ही तूर घरात पडून राहिली तर पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील अशी भीती शेतकरी संघटनेने याचिकेत व्यक्त केली आहे. 

तूर पेरायला लावून ती खरेदी केली जात नसल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी तक्रार पैठण पोलिस ठाण्यात करून मुख्यमंत्री, महसूलमंत्री व पणन मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नुकतीच अन्नदाता शेतकरी संघटनेने केली होती. त्यानंतर आज राज्यातील सर्व शिल्लक तूर खरेदी करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 22 एप्रिल पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाईल अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात 
शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. मराठवाड्यात एकूण 92 दिवस तूर खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात आले, परंतु 17 शासकीय सुट्या आणि बारदाना नसल्यामुळे 25 दिवस तूर खरेदी करण्यात आली नव्हती. म्हणजेच 92 पैकी केवळ 50 दिवस खरेदी केंद्र सुरू होते. यातही एक ग्रेडर असल्याने खरेदीची गती कमी होती असा आरोप संघटनेने आपल्या याचिकेत केला आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून यावर 2 मे रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख