Governement is Backing Dabholkar Killers | Sarkarnama

दाभोलकर, पानसरेंच्या खुन्यांच्या मागे सरकारी पाठबळ : अविनाश पाटील

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

''डाॅ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरेंच्या मारेक-यांना भाजप सरकार सतत पाठीशी घालत आले आहे. तपास यंत्रणा सरकारच्या इशा-यावर काम करत आहेत. त्यामुळे या आरोपींना शिक्षा होईल याविषयी शंकाच आहे," अशी भिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.

नाशिक : ''डाॅ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरेंच्या मारेक-यांना भाजप सरकार सतत पाठीशी घालत आले आहे. तपास यंत्रणा सरकारच्या इशा-यावर काम करत आहेत. त्यामुळे या आरोपींना शिक्षा होईल याविषयी शंकाच आहे," अशी भिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सभासद नोंदणीसाठी पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी त्यांनी पानसरे, दाभोलकर यांच्या मारेक- यांच्या विचाराशी भाजप सरकारला सहानुभूती असल्याचा थेट आरोप केला. ते म्हणाले, "पुरोगामी विचारसरणी असलेल्या या व्यक्तींच्या हत्येविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हा योगायोग कसा मानायचा. या घटनेतील तपासात अत्यंत मोठी दिरंगाई व कालापव्यय झाला. हत्येत सहभागी  मारेक-यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.  यामध्ये न्यायालयाने तपासयंत्रणाच्या संथपणाविषयी ताशेरे ओढले आहेत. मात्र सरकारने त्याबाबत काहीच कार्यवाही केली नाही. हे सर्वच अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे या यंत्रणांवरील विश्वास उडत चालला आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख