मोहन जोशींना उमेदवारी दिल्याबद्दल गौरव बापटांनी मानले काॅंग्रेसचे आभार!

मोहन जोशींना उमेदवारी दिल्याबद्दल गौरव बापटांनी मानले काॅंग्रेसचे आभार!

पुणे : काॅंग्रेसने मोहन जोशी यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्याबद्दल त्या पक्षाचे आभार गौरव बापट यांनी मानले आहेत. पुण्याचे पालकमंत्री आणि या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचे गौरव हे चिरंजीव आहेत.

त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ``गलिच्छ राजकारण करू पाहणाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता जुन्या निष्ठावंताला उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेसचे आभार. हार जीत हा मुद्दा गौण आहे. निवडणूक आम्ही जिंकूच, पण पुण्याच्या संस्कृतीची पायमल्ली होणार नाही याचाही आनंद आहे. 
श्री कसबा गणपती प्रसन्न !,`` असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यांच्या पोस्टचा रोख कोणाकडे आहे, हे लक्षात येते आहे. काॅंग्रेसमध्ये अनेक नावे चर्चेत होती. त्यात प्रवीण गायकवाड यांचे नाव आघाडीवर होते. त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर यांचा उल्लेख करत ही पदे कोणाकडे आहेत, असा सवाल विचारला होता. त्यावरून वेगवेगळी मते व्यक्त झाली होती.

काॅंग्रेसने निष्ठावंताना उमेदवारी दिल्याचा भाजपला आनंद का व्हावा, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कारण काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर घरबदलूंना भाजपने उमेदवारी दिली असल्याने एकदम निष्ठावंतांबद्दल आदर वाटतो आहे, याचेही कारण अनेकजण शोधत आहेत.

जोशींऐवजी इतर कोणी उमेदवार तगडा उमेदवार आला तर भाजपला निवडणूक अवघड जाईल, अशी चर्चा होती. या चर्चेला गौरव यांच्या पोस्टमुळे आणखी हवा मिळाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com