गणपतरावांच्या सांगोल्यावर गोपीचंद पडळकरांचा डोळा!

गणपतरावांच्या सांगोल्यावर गोपीचंद पडळकरांचा डोळा!

पुणे : तब्बल बारा वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांनी यंदाची 2019 मधील विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या सांगोला येथील जागेवर कोण उभे राहणार, याबाबत विविध तर्क लगावले जात आहेत. मात्र बहुजन वंचित विकासचे गोपीचंद पडळकर हे सांगोल्यातून आता नशीब अजमाविण्याची शक्यता आहे. तशी त्यांनी तयारी सुरू केली आहे.

गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी धनगर समाजातील काही नेते त्यांना आग्रह करीत आहेत. दुसरीकडे धनगर समाजासाठी सोप्या असलेल्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी महत्त्वाकांक्षी धनगर नेते तयारीला लागले आहेत. त्यात पडळकर यांनी उडी घेतली आहे. सांगोला मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचे गणित या आडाख्यामागे आङेत.

पडळकर यांनी सांगली येथून लोकसभा निवडणूक वंचितमधून लढवली होती. मात्र त्यांना यश आलं नाही. त्यांनी आता सांगोला मतदारसंघात उभा राहण्याची तयारी सुरू केली आहे. या पूर्वी पडळकर यांनी आटपाडी मतदारसंघातून दोन वेळा विधानसभा लढवली होती. 2009 मध्ये रिडालोस कडून तर 2014 मध्ये भाजपकडून त्यांनी नशीब अजमावले होते. त्यात त्यांना यश आले नाही.

गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करताच गोपीचंद पडळकर यांनी सांगोल्यातून तयारी सुरू केली आहे आटपाडी हा सांगोल्याच्या शेजारचा तालुका आहे. या दोन तालुक्यांतील लोकांचे प्रश्न समान आहेत. आटपाडी आणि सांगोला जवळ असल्यानं पडळकरांचं सांगोल्यातून लढवायच ठरलंय. जत विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी घ्यावी, अशीही  मागणी होत आहे. मात्र सध्या तरी त्यांनी सांगोल्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com