गोपिनाथ मुंडे स्मारकाला मागील सरकारने एक रूपयाही दिला नाही, खडसेंची खंत 

गोपिनाथ मुंडे स्मारकाला मागील सरकारने एक रूपयाही दिला नाही, खडसेंची खंत 

मुंबई : गोपिनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी गेल्या पाच वर्षात एक रूपयाही दिला नाही असे सांगतानाच हे स्मारक पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण साकडे घातले असून त्यांनी हे स्मारक पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज दिली. 

दरम्यान, भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपिनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले असून माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या जात आहे. गोपिनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध पक्षाचे नेते दाखल झाले आहेत. 

पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून आहे. पक्षाच्या दोन बैठकीलाही त्या उपस्थित नव्हत्या. गोपिनाथ गडावर त्या काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. 

गडावर जे कार्यकर्ते आले आहेत त्यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधीनी संपर्क साधला असता पक्षात ताईंवर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्ही फक्त पंकजाताईंचे कार्यकर्ते आहोत. त्या ज्या पक्षात जातील तो आमचा पक्ष असेल. भाजपनेही त्यांची नाराजी दूर करून त्यांना महत्त्वाचे पद द्यावे अशी मागणी केली आहे.

तर दुसरीकडे गोपिनाथ मुंडे यांचे स्मारक भाजप सरकारने का पूर्ण केले नाही ? या स्मारकासाठी निधी का दिला नाही ? असा सवाल भाजपचे दुसरे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. 

या स्मारकासाठी गेल्या पाच वर्षात एक रूपयाही दिला नाही असे सांगतानाच हे स्मारक पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण साकडे घातले असून त्यांनी हे स्मारक पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे पूर्वी स्मारकाचे अध्यक्ष होते मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर या स्मारकाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील बनले. तरीही निधी का देण्यात आला नाही असा सवालही केला जात आहे. या सर्व घडामोडीवर पंकजाताई काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com