मुंडेचे स्मारक बारगळणार, सत्ता असूनही निधी नाही !

वर्षभरात मंजुरी आणि निधी आणू-डॉ. कराडगोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव सरकारकडे पडून आहे, पण मी स्वःता यासाठी पुढाकार घेणार आहे. येत्या वर्षभरात प्रस्तावाला मंजूरी आणि निधी आणून प्रत्यक्षात कामाला सुरूवात करू असे आश्‍वासन मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिले.
Munde-Memorial
Munde-Memorial

औरंगाबाद: ज्यांच्या जीवावर  पक्षाने सोशल इंजिनिअरिंगचे  राजकारण करीत राज्यात कमळ फुलविले, त्याच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा प्रश्‍न चार वर्षांपासून प्रलंबित आहे. 

तत्कालिन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 2015 मध्ये स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी शासकीय दुध डेअरीच्या जागेचही निवडही करण्यात आली. सरकार दरबारी या स्मारकाचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. राज्यात भाजपचे सरकार असतांना गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला निधी मिळू नये या सारखे दुसरे दुर्दैव नसल्याचे मुंडे समर्थकांकडून बोलले जात आहे. 

बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक शहरात असावे यासाठी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुढाकार घेत तशी घोषणा केली होती. औरंगाबादेतील शासकीय दुध डेअरीची दोन एकर जागा यासाठी निवडण्यात येऊन सल्लागार मंडळाची स्थापना देखील करण्यात आली. 

मे 2015 मध्ये खडसे यांनी त्यांच्या दालनात नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, बालविकास मंत्री पंकजा मुंडे, तत्कालीन विभागीय आयुक्‍त उमाकांत दांगट व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यानंतर 2016 मध्ये या स्मारकासाठी दिल्लीच्या एका ठेकेदारास प्रस्ताव तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. 

दरम्यान, महसुल मंत्री एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार व्हावे लागले आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्मारकही रखडले. प्रस्तावाला मंजुरी आणि निधी दोन्ही नसल्याने भाजप सरकारकडूनच गोपीनाथ मुंडेची उपेक्षा केली जात असल्याची भावना समर्थकांमध्ये आहे.

दरवर्षी गोपीनाथ मुंडेच्या पुण्यतिथीला स्माराकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर भाजपचे नेते, पदाधिकारी अभिवादनासाठी जातात. पण त्यांच्या स्मारकासाठी मात्र कुणीच पुढाकार घेत नसल्याची खंत देखील व्यक्त केली जात आहे. 

गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पित स्मारकाच्या दोन एकर जागेत उद्यान, स्मारक, त्यांच्या ग्रंथ, छायाचित्रांचे संग्रहालय, शंभर आसन क्षमतेचे एम्पी थिएटर उभारण्यात येणार आहे. हे स्मारक सध्या कागदावर असून ते प्रत्यक्षात कधी येणार यांची वाट गोपीनाथ मुंडेंचे चाहते पाहत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com