गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करताना धनंजय मुंडे राजकीय चर्चा टाळणार का

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त जामखेड येथील 'गोपीनाथ मुंडे सामाजिक प्रतिष्ठान' च्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निमंत्रित केल्याने नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. दुपारी दोन वाजता मुंडे येथे येणार आहेत, यानिमित्ताने नेमके काय बोलतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Gopinath Munde Dhanajay Munde
Gopinath Munde Dhanajay Munde

नगर (जि. नगर) : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त जामखेड येथील 'गोपीनाथ मुंडे सामाजिक प्रतिष्ठान' च्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निमंत्रित केल्याने नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. दुपारी दोन वाजता मुंडे येथे येणार आहेत, यानिमित्ताने नेमके काय बोलतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हा कार्यक्रम राजकीय नसून 'नेतृत्वाच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा,आठवणींना उजाळा देण्याचा' असल्याचे अयोजकांनी सांगितले.  मात्र, गोपीनाथ मुंडेचे नाव आले की राजकारणाची चर्चा येणारच ? त्यामुळे त्यांचा स्मृतीदिनही राजकीय चर्चे शिवाय  होणे शक्यच नाही,तरीही आयोजकांनी मोठ्या कसरतीने राजकारणाचे जोडे बाजुला ठेवून तालुक्यातील मुंडेप्रेमींना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.

जामखेड येथे दरवर्षी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन (ता. 4) साजरा केला जातो. यानिमित्ताने दरवर्षी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या खासदार प्रितम मुंडे-खाडे यांना निमित्त केले जात होते. यावर्षी लोकनेते मुंडे यांचे पुतणे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निमंत्रित करुन नवीन चर्चेला तोंड फोडले आहे. कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे प्राबल्य राहिलेले आहे. त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग येथे असून, त्यांच्यामुळेच सलग चार वेळा तर त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या पकंजा यांच्यामुळे पाचव्यांदा भाजपने हा मतदारसंघ ताब्यात ठेवला. मुंडे यांच्या पश्चात येथे स्मृती दिनाचा कार्यक्रम मुंडे प्रेमींनी घ्यायला सुरुवात केली. कार्यक्रमासाठी मुंडे परिवारातील घटकास निमंत्रित करण्याची प्रथा द्रढ केली. त्यामुळे आपसुकच त्यांच्या कन्या खासदार प्रितम यांना निमंत्रित केले. 

मात्र, या वेळी धनंजय यांनी निमंत्रित करुन चर्चेला वाट मोकळी करुन दिली. धनंजय हे अखेरच्या टप्प्यात गोपीनाथ मुंडेंपासून राजकीयदृष्ट्या दुरावलेले होते. भाजपला सोडचिठ्ठी देऊन मुंडेचे आयुष्यभर कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या माजी केंद्री मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मुंडे -पवाराचे राजकीय वैर सपूंर्ण राज्याला ज्ञात आहे. त्यामुळे धनंजय यांच्या राजकीय करिअरपेक्षा त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मुंडे समर्थकांमध्ये चीड निर्माण झाली होती. त्यामुळे धनंजय यांच्या कडे मुंडे समर्थकांनी पाट फिरवली होती.

मात्र, मागील वर्षा पासून त्यांना मुंडे समर्थक गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास निमंत्रित करु लागले आहेत. यवतमाळ, सोलापूर पाठोपाठ नगर जिल्ह्यात त्यांना निंमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे जामखेड येथे त्यांच्या येथे येण्याला अन्यसाधारण महत्त्व आहे. यानिमित्ताने ते काय बोलतात? याकडे सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com