गोपीचंद पडळकर `वंचित विकास` सोडण्याच्या तयारीत.. शेकापच्या वाटेवर

गोपीचंद पडळकर `वंचित विकास` सोडण्याच्या तयारीत.. शेकापच्या वाटेवर

सोलापूर : गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन सांगली लोकसभा निवडणुकीत सुमारे  तीन लाख मते घेतली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीतून आमदार होण्याची संधी मिळणार नाही याची जाणीव झाल्यानेच ते आता शेकाप च्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

गोपीचंद पडळकर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा करणार असून तेथील धनगर समाजासह अन्य जाती- जमतीमधील कार्यकर्ते, नेत्यांचा आग्रह असल्याचे पडळकर यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

मात्र, वंचित बहुजन आघाडी की शेकाप मधून लढणार हे निश्चीत नसल्याचे ते म्हणाले. जेष्ठ आमदार आणि धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांगोल्यातून विजयाची खात्री 

सर्वाधिक धनगर समाज असलेला जिल्हा म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. त्यातच जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची मदत, धनगर समाजासह अन्य समाजातील तरुणांमध्ये पडळकर यांची क्रेझ आहे. यामुळे आमदारकिची संधी निश्चीत मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांच्या बळावर पडळकर यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com