कॉंग्रेसच्या गोपालदास अग्रवालांसाठी मुख्यमंत्री सायंकाळी नागपुरात

गेल्या 30 वर्षांपासून कॉंग्रेससोबत एकनिष्ठ असलेले गोंदीयाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी 5.30 वाजता नागपुरात येणार आहेत.
कॉंग्रेसच्या गोपालदास अग्रवालांसाठी मुख्यमंत्री सायंकाळी नागपुरात

नागपूर - गेल्या 30 वर्षांपासून कॉंग्रेससोबत एकनिष्ठ असलेले गोंदीयाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी 5.30 वाजता नागपुरात येणार आहेत. 

गणेशपेठच्या मंगलमय कॉम्प्लेक्‍समधील भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अग्रवाल आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार असल्याचे विश्‍वसनिय सुत्रांनी सांगीतले.

गोपालदास अग्रवाल गोंदियातून दोन वेळा विधानपरीषदेचे आमदार राहीले आहेत, तर तीन वेळा विधानपरीषदेवर निवडून गेले आहेत. विशेष म्हणजे 2014 मध्ये मोदी लाटेतही त्यांनी कॉंग्रेसला गोंदियात विजय मिळवून दिला होता. त्यांच्या या निर्णयाने कॉंग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र आहे. अग्रवाल भाजपात प्रवेश घेणार म्हणून काही दिवसांपूर्वी भाजपचे नगर परीषद उपाध्यक्ष शिव शर्मा यांनी आमदार अग्रवाल यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन तमाशा केला होता. याच आरोपात सध्या ते जामीनावर असल्याचे सांगण्यात येते.

भाजपचे कार्यकर्ते देणार सामूहीक राजीनामे
या घडामोडीच्या पृष्ठभूमीवर 15 दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभा घेतली. या सभेत जवळपास 500 कार्यकर्ते हजर होते. अग्रवाल भाजपमध्ये आल्यास आपण सामूहीक राजीनामा देऊ, असा निर्णय या कार्यकर्त्यांनी घेतल्याचीही माहीती आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजपचे एकही पदाधिकारी उपस्थित नव्हते. कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने ही सभा घेतली होती.

गोंदीयातील भाजपचे उमेदवार अपक्ष लढणार की कॉंग्रेसकडून ?
2014 च्या निवडणुकीत गोपालदास अग्रवाल यांच्या विरोधात लढलेले भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल अपक्ष लढणार असल्याची माहीती आहे. गेल्या निवडणुकीत विनोद यांचा चार हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी त्यांना निवडून येण्याची पूर्ण खात्री होती. पण अचानक या घडामोडी झाल्यामुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विनोद अग्रवाल यांना कॉंग्रेसकडून लढण्याची ऑफर दिली. पण अपक्ष निवडणुक लढविण्यावर ते ठाम असल्याचे सुत्रांनी सांगितले.

गोंदियाच्या राजकारणात झालेल्या या घडामोडींबाबत अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. उद्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरविणार आहो.
- विनोद अग्रवाल, गोंदिया

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com