Google Search Leading Sharad Pawar that Devendra Fadanavis | Sarkarnama

गुगल ट्रेंडिंग - PAWAR IS POWER

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या एकाच नावाभोवती झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान पवारांची पॉवर किती आहे, हे गुगल सर्चमधून समोर आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या महिनाभरात शरद पवार 'गुगल सर्च'मध्ये देशभर ट्रेंडिग असल्याचे चित्र आहे. पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा क्रमांक लागतो. तर यानंतर उद्धव ठाकरे या नेत्यांबद्दल लोकांनी 'गुगल'वर सर्वाधिक माहिती शोधली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या एकाच नावाभोवती झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान पवारांची पॉवर किती आहे, हे गुगल सर्चमधून समोर आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या महिनाभरात शरद पवार 'गुगल सर्च'मध्ये देशभर ट्रेंडिग असल्याचे चित्र आहे. पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा क्रमांक लागतो. तर यानंतर उद्धव ठाकरे या नेत्यांबद्दल लोकांनी 'गुगल'वर सर्वाधिक माहिती शोधली आहे. 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे मतदान 21 ऑक्टोबरला झाले. तर निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्या दिवशी शरद पवार यांच्याबद्दल 'गुगल'वर सर्वात जास्त सर्च करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे केंद्रस्थानी होते आणि आता सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसतानाही पवारच केंद्रस्थानी आहेत. निवडणुकीच्या काळात शरद पवार यांनी झंजावाती प्रचार दौरे केले. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात जान आणली होती. त्यांचे साताऱ्यातील पावसातील भाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

या सर्व घडामोडींचा प्रभाव 'गुगल' सर्चमध्येही दिसला. त्यामुळेच निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार यांच्याबद्दल सर्वाधिक प्रमाणात माहिती सर्च करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत सातत्याने गुगल सर्चमध्ये शरद पवार ट्रेंडिंगमध्ये आहेत. 'गुगल ट्रेंड'च्या माहितीवरून हे स्पष्ट होते. 'गुगल सर्च', 'गुगल न्यूज' आणि 'यूट्यूब' यांच्या एकत्रित सर्चवरून 'गुगल ट्रेंड'ची आकडेवारी उपलब्ध केली जात असते. 'गुगल ट्रेंड'वर 9 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या नेत्यांबद्दल तुलनात्मक ट्रेंड पाहिले असता ही माहिती मिळाली आहे.

सर्चची आकडेवारी
शरद पवार : 61 टक्के

देवेंद्र फडणवीस : 23 टक्के
उद्धव ठाकरे : 11 टक्के
संजय राऊत : ५ टक्के

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख