पहिल्याच भाषणात प्रतिभा धानोरकरांनी घेतल्या टाळ्या!

...
pratibha dhanorkar first speech in assembly
pratibha dhanorkar first speech in assembly

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचे हे पहिलेच अधिवेशन. गेल्या चार दिवसापासून आज प्रथमच त्यांना बोलण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच वेळी 'अच्छे दिन' आणि 'मी पुन्हा येईन' यावरून विरोधकांना सुनावले. त्यांच्या सहकारी सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे कौतुक केले.

त्या म्हणाल्या, सत्ताधारी विरोधी बाकावर बसले की त्यांची मानसिकता बदलते, हे मी आजपर्यंत ऐकले होते. पण या सभागृहात हे पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले. आमची तीन चाकी रिक्षाची सरकार असल्याचे विरोधक वारंवार बोलत आहेत. तीन वेगवेगळ्या मतांची लोक एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही एका सक्षम नेतृत्व खाली सरकार स्थापन केली आहे. पण निव्वळ घोषणा देणारे आमचे सरकार नाही. प्रत्यक्ष कृती करणारे आमचे सरकार आहे आणि येत्या पाच वर्षात हे सिद्ध देखील होईल. नाही तर गेल्या पाच वर्षात 'अच्छे दिन' देशातील जनतेने पाहिले, आम्ही सुद्धा पाहिले.

  'मी पुन्हा येईन' चे काय झाले ही सर्व देशाने पाहिले. अनपेक्षित पणे सत्ता गेल्यामुळे विरोधक आज वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसतात. त्यांनीही थोडा संयम बाळगावा. काही महिन्यात विरोधी बाकांवर बसण्याची सवय होईल, असा टोलाही प्रतिभाताईंनी लगावला.

हे अधिवेशन जरी प्रतिभाताईंच पहिलच असलं तरीही राजकारणाचा आणि समाजकारणाचा अनुभव त्यांचा कमी निश्चितच नाही. कारण त्यांचे पती महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरापासून ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी आर्णी, झरीजामणी पर्यंत अतिशय सक्षम पणे सांभाळली होती. आजच्या त्यांच्या भाषणाने प्रतिभाताई तुम्ही तोडलंस, अशा शब्दांत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यांच्या सहकारी सदस्यांनी बाकडे वाजवून त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com