गुड न्यूज : नागपुरात काल आढळला नाही एकही कोरोनाबाधीत, 'त्या' मृताचा अहवाल निगेटिव्ह

उपराजधानीत कोरोना दाखल झाल्यापासून आतापर्यंत १६ जण विळख्यात सापडले. सोमवारी सायंकाळी मेयो (इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, रुग्णालय) रुग्णालयात करोना सदृष्य आजाराची लक्षणे घेऊन आलेल्या एका संशयिताचा मृत्यू झाला. मात्र काल (मंगळवारी) या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाच्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नागपूरकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे
No New Patient in Nagpur Yesterday
No New Patient in Nagpur Yesterday

नागपूर : उपराजधानीत कोरोना दाखल झाल्यापासून आतापर्यंत १६ जण विळख्यात सापडले. सोमवारी सायंकाळी मेयो (इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, रुग्णालय) रुग्णालयात करोना सदृष्य आजाराची लक्षणे घेऊन आलेल्या एका संशयिताचा मृत्यू झाला. मात्र काल (मंगळवारी) या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाच्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नागपूरकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. नागपुरकरांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे काल एकही कोरोनाबाधित आढळला नाही. 

नवी दिल्ली येथून प्रवास करून आल्यानंतर नागपुरात एम्प्रेस सिटीतील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील चार सदस्यांना मेयोच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करून घेण्यात आले. त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. मेयोत सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार घेऊन एक जण उपचाराला आला. त्याची डॉक्टर तपासणी करीत असतानाच अवघ्या दिड तासांत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याचे निधन झाले. हा रुग्ण करोना संशयित असल्याने त्याच्या घशातील द्रवाचे नमुने तडकाफडकी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला, तो निगेटीव्ह होता. 

मेयोत २० तर मेडिकलला १२ संशयित

काल मंगळवारी एकही नवीन कोरोनाबाधीत ढळला नाही. शहरात गेल्या पाच दिवसांत १२ करोना बाधीत रुग्ण आढळले होते. त्यामुळे या संशयितांच्या संपर्कातील आणि इतर लक्षणे असलेले सुमारे दीडशेहून अधिक व्यक्तींना महापालिकेच्या आरोग्य विभागासह सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चमूने मेडिकल, मेयोत दाखल केले. सोबत आजही या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून त्यामुळे रुग्णालयासह जिल्हा प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे. २५ ते ३० मार्च दरम्यान सतत शहरात १२ रुग्ण आढळल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त होत होती.  मंगळवारी संध्याकाळपर्यंत मेयोत २० तर मेडिकलला १२ अशा एकूण करोनाची लक्षणे असलेल्या ३२ संशयीतांना दाखल केले गेले.

आतापर्यंतची स्थिती

दैनिक संशयित  १७७
एकूण संशयित  ८९३
सध्या भरती व्यक्ती   ८७
एकूण भरती व्यक्ती  ६२६
दैनिक तपासणी नमुने  १६३
एकूण तपासणी नमुने  ७०२
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने   १६
पाठपुरावा सुरु असलेल्या व्यक्ती १२००
१४ दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती  ७५
विमानतळावर एकूण स्क्रिनिंग प्रवासी ११२३
आज अलगीकरण केलेले प्रवासी  ३६
सध्या अलगीकरण कक्षातले प्रवासी  २३९

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com