'गोकुळ'साठी 20 एप्रिलला मतदान 

ज्या कागदावर संस्थेने ठराव करून पाठवायचा आहे तो विहीत नमुन्यात असेल, त्याचा रंग हिरवाच असेल. गेल्या निवडणुकीत हा रंग गुलाबी होता. एखाद्या संस्थेकडून हिरव्या आणि पांढऱ्या रंगातही ठराव आला तर त्याची शहानिशा करून खरा ठराव निश्‍चित करण्यात येईल.
gokul election  announced
gokul election announced

कोल्हापूर : गेले वर्षभर मल्टिस्टेटवरून गाजत असलेल्या व लोकसभा, विधानसभेत त्याचे पडसाद उमटलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) 13 किंवा 20 एप्रिल रोजी मतदान होण्याची शक्‍यता आहे.

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे पोलीस बंदोबस्त मिळण्यातील अडचण लक्षात घेत हे मतदान 20 एप्रिल रोजी होईल, अशी माहिती सहकार उपनिबंधक (दुग्ध) सुनिल सिरापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, या निवडणुकीसाठी प्राथमिक दूध संस्थांकडून ठराव संकलित करण्यास 23 डिसेंबरपासून सुरूवात होणार असून 22 जानेवारी 2020 हा ठराव सादर करण्याचा अखेरचा दिवस असेल. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळात सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडून संस्थांना ठराव दाखल करण्यासाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज रजिस्टर पोष्टाने पाठवण्यात येणार असल्याचे श्री. सिरापूरकर यांनी सांगितले.

श्री. सिरापूरकर म्हणाले,"नव्या सहकार कायद्यानुसार ही निवडणूक होईल. संचालक मंडळाच्या पुर्वी 18 जागा होत्या, त्यात यावेळी तीन जागा वाढणार आहेत. वाढीव जागा ह्या सर्वसाधारण गटातील असतील, उर्वरित पाच जागा राखीव गटातून निवडण्यात येतील. 22 जानेवारी 2020 हा ठराव सादर करण्याचा अखेरचा दिवस असेल. त्यानंतर आठ दिवसांत आलेल्या ठरावांची अद्याक्षरांनुसार यादी तयार केली जाईल. त्यावर दहा दिवसांत हरकती मागवल्या जातील. त्यानंतर हरकतीवरील सुनावणी व निकाल देण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागेल. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com