जयप्रकाश नारायणांनी गौरवलेला तारा आज निखळला - योगेश गोगावले

जयप्रकाश नारायणांनी गौरवलेला तारा आज निखळला - योगेश गोगावले

पुणे : "सिंहासन खाली करो, जनता आई है' या आणीबाणीच्या काळातील जयप्रकाश नारायण यांच्या घोषणेने सारा देश व्यापून टाकलेल्या त्या काळातील देशातील एक प्रमुख विद्यार्थी नेता म्हणून अरूण जेटली यांचा उल्लेख करावा लागेल. या काळातील त्यांची धडाडी पाहून देशाच्या राजकीय नेतृत्वामधील उगवता तारा असल्याचा गौरव स्वत: जयप्रकाश नारायण यांनी जेटली यांच्याबाबत केला होता,अशी आठवण भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व पुण्याचे माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितली. 

आणीबाणी आणि त्यानंतरच्या काळात जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद जेटली यांच्याकडे होते. त्या काळात पुण्याचा अध्यक्ष मी होतो, अशी आठवण गोगावले यांनी सांगितली. ते म्हणाले, "" देश पातळीवरील विद्यार्थी नेता अशी जेटली यांची त्या काळात ओळख होती. आणीबाणीच्या आंदोलनात त्यांचे विद्यार्थी नेतृत्व पुढे आले. जयप्रकाश नारायण यांचा त्यांच्यावर विश्‍वास होता. त्यांच्या कामाची धडाडी पाहून हा मुलगा देशाच्या राजकाणातील उगवता तारा आहे, असा उल्लेख जयप्रकाश नारायण यांनी मुंबईतील एका आंदोलनात केला होता, अशी आठवण गोगावले यांनी सांगितली. आणीबाणीनंतर जनता पार्टीचे सरकार सत्तेत आले. या काळात जेटली यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने बहरले. उमदेपणा, शिस्त, संयम आणि तितकाच प्रामाणिकपणा या गुणांमुळे वकीली व्यवसायाबरोबरच जेटली यांचे भारतीय पार्टीतदेखील महत्वाचे स्थान राहिले, असे गोगावले यांनी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com