युतीच्या गोडसे, पवारांच्या शक्तीप्रदर्शनाला आदित्य ठाकरे, गिरीश महाजनांचे बळ

शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि भाजपच्या डॉ. भारती पवार येच्या सोमवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहुन त्यांना बळ देतील. त्यामुळे यावेळी होणाऱ्या शक्तीप्रदर्शनाकडे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे लक्ष लागले आहे.
युतीच्या गोडसे, पवारांच्या शक्तीप्रदर्शनाला आदित्य ठाकरे, गिरीश महाजनांचे बळ

नाशिक : शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि भाजपच्या डॉ. भारती पवार येच्या सोमवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहुन त्यांना बळ देतील. त्यामुळे यावेळी होणाऱ्या शक्तीप्रदर्शनाकडे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व डॉ. भारती पवार येत्या सोमवारी (ता. ८) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या निमित्ताने शहरात युतीच्या वतीने शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने छोटेखानी सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित राहतील. आदित्य ठाकरे उपस्थित राहणार असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांना गर्दी जमविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दिंडोरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी वाहनांची सुविधा करण्याच्या सुचना केल्या आहे. दोन्ही पक्षात दोन्ही मतदारसंघात बंडखोरीची तिन्हे आहेत. त्यामुळे याबाबत दक्षता घेण्याच्या विशेष सुचना आहेत.

नऊ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे सोमवारी (ता. ८) महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाल्याने युतीच्या वतीने आठ तारखेचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला आहे. युतीचे गोडसे व डॉ. पवार दोन्ही उमेदवार एकत्रित अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नाशिकमध्ये आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गोल्फ क्‍लब मैदानावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघेल. यातून शक्तिप्रदर्शन केले जाईल.

मेहेर सिग्नलपर्यंत रॅली काढली जाणार असून, छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये छोटी सभा घेण्याचे नियोजन महायुतीच्या वतीने केले जाणार आहे. भाजपकडून पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह शिवसेनेच्या वतीने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे संपर्कमंत्री भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित राहतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com