विश्वजित राणे - अमित शहांच्या भेटीची गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मंगळवारी घेतलेली भेट गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली आहे. राणे यांची यापूर्वीची दिल्लीवारी राजकीय चर्चेत आली होती, त्यामुळे आताच्या दिल्लीवारीपूर्वी रविवारी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या घरी जात भेट घेऊन दिल्लीवारी का आवश्यक आहे, हे पटवून दिले होते.
Goa Minister Vishwajeet Rane Meets Amit Shah
Goa Minister Vishwajeet Rane Meets Amit Shah

पणजी : गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मंगळवारी घेतलेली भेट गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली आहे. राणे यांची यापूर्वीची दिल्लीवारी राजकीय चर्चेत आली होती, त्यामुळे आताच्या दिल्लीवारीपूर्वी रविवारी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या घरी जात भेट घेऊन दिल्लीवारी का आवश्यक आहे, हे पटवून दिले होते.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर राणे यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाईल अशी चर्चा होती. त्याचसाठी त्यांनी कॉंग्रेसमधून दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर या आमदारांना आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आणले होते. त्यांच्या भाजप प्रवेशावेळी भाजपच्या दिल्ली मुख्यालयात राणे होते. त्यामुळे ते भावी मुख्यमंत्री असतील अशी दबकी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे राणे यांच्या दिल्ली वाऱ्यांकडे राजकीय चष्म्यांतून पाहिले जात आहे.
पर्रीकर यांची डॉ. सावंत यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती. पर्रीकर यांच्यानंतर कोण या पेचावर विचार कऱण्यासाठी शहा यांनी त्यावेळी दिल्लीत एक बैठक घेतली होती. त्यावेळी डॉ. सावंत यांना पर्रीकर यांनी रातोरात दिल्लीला पाठवले होते मात्र दिवसभर थांबूनही त्यांना शहा यांची भेट मिळाली नव्हती. त्यामुळे राणे हे त्यावेळी प्रबळ दावेदार मानले जात होते.

मुख्यमंत्र्यांचा साखळी विधानसभा मतदारसंघ आणि राणे यांचा वाळपई मतदारसंघ जवळजवळ आहेत. गोव्यातील २७ हजार मतदार असलेल्या छोट्या मतदारसंघात शेकडो मते इकडची तिकडे झाल्यास राजकीय समीकरण बदलते.त्यामुळे साखळीचा प्रभाव वाळपईवर आणि वाळपईचा प्रभाव साखळीत जाणवणे शक्य आहे. त्यातच राणे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा दडून न राहिल्याने त्यांच्या दिल्लीवारीकडे भाजपचे इतर मंत्री साशंकतनेच पाहत असतात. त्यांच्या मागील दिल्लीवारीनंतर काही बैठकांत काही मंत्र्यांनीच हा विषय़ उपस्थित केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर प्रतिक्रीया देणे टाळले होते.

मुख्यमंत्र्यांनी 'क' वर्ग कर्मचारी भरती ही गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत होईल, असे ठरवून खात्यांचे कर्मचारी भरतीचे अधिकार काढून घेतले आहेत. राणे यांच्या आरोग्य खात्यात सर्वाधिक नोकर भरती होणार होती. ते अधिकार मुख्यमंत्र्यांनी काढून घेऊन त्यांना अप्रत्यक्षपणे शह दिल्याचे मानले जात आहे. त्यातच आज राणे यांनी शहा यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा न रंगल्यास नवल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com