goa cm pramod sawant on amal mahadik | Sarkarnama

पुतण्याला हरवणे अमल महाडिकांसाठी फारच सोपे!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

राफेल विमानाची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पूजा केली. ती योग्य आहे का?, या प्रश्‍नावर मुख्यमंत्री श्री. सावंत म्हणाले, ""विजया दशमी दसऱ्याला शस्त्रपूजनाची आपली परंपरा आहे. राफेल विमान हे सुध्दा देशाच्या संरक्षणासाठीचे एक शस्त्र असून त्याची पूजा केली म्हणून काय बिघडले?''

कोल्हापूर :  विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी आज ते येथे आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार अमल महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, गोकुळचे संचालक बाबा देसाई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. सावंत म्हणाले, "देशात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच वर्षे सरकारने कार्यकाल पूर्ण केला. शेती, शिक्षण, उद्योग असोत किंवा युवकांसाठीच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. पाच वर्षे मी सुध्दा कोल्हापुरात वास्तव्याला होतो. त्यामुळे येथील जनमाणसाचा मला अंदाज आहे. या निवडणुकीतही ते महायुतीचेच उमेदवार निवडून देतील.'' पाठपुरावा सुरू आहे.''

आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर टोलमुक्त केले. "मेक इन इंडिया', "स्टार्ट अप इंडिया'मधून लवकरच अनेक उद्योग येथे येणार आहेत. त्यांचे एकूणच काम पहाता त्यांचा विजय निश्‍चित आहे. त्यांनी गेल्या वेळी माजी मंत्र्यांचा पराभव केला. मग, आता तर त्यांच्या पुतण्याला हरवणे फारच सोपे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. सावंत म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख