give support to progressive transformation says k p patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मलबार हिल मतदार संघात भाजप चे मंगल प्रभात लोढा आघाडीवर
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ : पाचव्या फेरीत मुख्यमंत्री 11084 मतांनी पुढे
चंद्रकांत पाटील यांना सहाव्या फेरीअखेर ११ हजार, ५६५ मतांची आघाडी
मुक्ताईनगर सहाव्या फेरीत रोहिणी खडसे 2633 मतांनी पुढे
ऐरोली - गणेश नाईक 16308 मतांनी आघाडीवर
कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांची आघाडी कायम आठव्या फेरीअखेर 12915 मतांची आघाडी
बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

परिवर्तनाच्या लढ्याला बळ द्यावे - के. पी. पाटील

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मतदारसंघातील सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित असताना केवळ प्रशासकीय मान्यतेच्या कागदावर नारळ फोडणाऱ्यांनी जनतेला खुळे समजू नये, असा टोला के. पी. पाटील यांनी प्रकाश आबिटकरांचे नाव न घेता लगावला. परिवर्तनाच्या या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

सोळांकूर : मतदारसंघातील सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित असताना केवळ प्रशासकीय मान्यतेच्या कागदावर नारळ फोडणाऱ्यांनी जनतेला खुळे समजू नये, असा टोला के. पी. पाटील यांनी प्रकाश आबिटकरांचे नाव न घेता लगावला. परिवर्तनाच्या या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

गवशी येथे प्रचार दौऱ्यातील सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील गवशीकर होते. 

जि. प.चे सदस्य विनय पाटील म्हणाले, ""के. पी. पाटील यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासाची नोंद घेत धामोड खोऱ्याचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे के. पी. पाटील हेच सक्षम पर्याय आहेत. आपण सर्वांनी त्यांना मदत करून विकासाचे स्वप्न साकार करूया.'' 

बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील म्हणाले, ""धामोड खोऱ्यातील पायाभूत प्रश्नांचे आकलन फक्त के. पी. पाटील यांना आहे. या परिसरातील धामणी जलाशयाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी परिवर्तनाच्या रॅलीत सहभागी व्हावे.'' 

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील, पी. डी. धुंदरे, संजय कलिकते, उमेश भोईटे, मोहन पाटील, विलास भित्तम, गणपती भित्तम, संजय भित्तम, देवबा भित्तम, सर्जेराव चौगले, राजेंद्र पाटील, खंडू सावंत, विलास सावंत, दगडू माने उपस्थित होते. के. पी. पाटील यांनी राधानगरी तालुक्‍यातील गवशी, कोनोलीतर्फे पाटीलवाडी, कुपलेवाडी, पकालेवाडी, खामकरवाडी आदी गावांचा संपर्क दौरा केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख