लोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावेः सचिन सावंत

राज्यात अगोदरच नव्वदी पार गेलेल्या पेट्रोलने आज मुंबई ठाणे शहर व परिसरातही नव्वदी पार केली आहे. डिझेलचे दरही प्रति लिटर 80 रूपयांच्या वर गेले आहेत व डॉलरच्या तुलनेत रूपयांची ऐतिहासीक घसरण झाली आहे. याविरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात काँग्रेस पक्षातर्फे ठाणे येथे अनोखे आंदोलन करण्यात आले
लोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावेः सचिन सावंत

मुंबई - पेट्रोलचा दर नव्वदीपार व एक लिटर डिझेलची किंमत 80 रूपयांवर गेल्याने आता पेट्रोलपंपांना संरक्षण देण्याची वेळ आली असून जनतेनेही लग्नात पेट्रोल, डिझेलचा आहेर देणे सुरु करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. 

राज्यात अगोदरच नव्वदी पार गेलेल्या पेट्रोलने आज मुंबई ठाणे शहर व परिसरातही नव्वदी पार केली आहे. डिझेलचे दरही प्रति लिटर 80 रूपयांच्या वर गेले आहेत व डॉलरच्या तुलनेत रूपयांची ऐतिहासीक घसरण झाली आहे. याविरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात काँग्रेस पक्षातर्फे ठाणे येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि डॉलरची साग्रसंगीत पूजा अर्चा करण्यात आली. ॐ पेट्रोलाय नमः।ॐ डिझेलाय नमः।ॐ डॉलराय नमः। अशा मंत्रोच्चारातून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. 

या प्रसंगी बोलताना सचिन सावंत म्हणाले, "मोदींच्या नेतृत्वाखाली पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. मोदींच्या कर्तृत्वाने डिझेलच्या दराची वाटचालही शंभरीच्या दिशेने वेगात सुरु आहे. त्यामुळे आता पेट्रोलपंपांना संरक्षण तर द्यावे लागेलच. सोबतच पेट्रोल, डिझेलची पुजाही करावी लागेल. सत्तेच्या उन्मादात मोदींना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी सरकार चालवणा-या मोदींना सर्वसामान्य जनतेचा आक्रोश दिसत नाही. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा मार सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांनाही बसत आहे. त्यामुळे या बहि-या सरकारचे कान उघडण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करेल," 

2019 ला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हीच गोरगरिब जनता सर्वसामान्यांचे सरकार आणेल असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनीही इंधनदरवाढीवरून सरकारचा निषेध केला व ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. यावेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com