मिस्ड काॅल द्या...किराणा दारात येईल : पुण्याच्या नगरसेवकाचा 'लाॅकडाऊन' फंडा!

गरिबांना मदत करतानाच सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेत, नगरसेवक राजेश बराटेंनी घरपोच धान्य वाटप करण्याची योजना आखली. हे साहित्य घेण्यासाठी लोक घराबाहेर येणार नाहीत, हा विचार करीत मिस्ड कॉल किंवा फोन करा, काही मिनिटांत तुम्हाला साहित्याचे पाकिट मिळेलअसा शब्दही बराटेंनी दिला आहे
Give Missed Call for Free Food Grains Pune Corporators Funda
Give Missed Call for Free Food Grains Pune Corporators Funda

पुणे : एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा धास्ती वाढवत असतानाच 'लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पायही ठेवू नये, याकरिता भाजप नगरसेवक राजेश बराटेंनी चांगली शक्कल लढविली. 'जिथे कुठे आहात; तिथेच थांबा, माझ्या मोबाईलवर मिस्ड कॉल करा,' अशी हाक देतानाच 'माझ्या घरातील किराणा साहित्याचे पाकिट तुमच्या दारात येईल, पण घर सोडून नका,' अशी विनवणी बराटेंनी आपल्या प्रभागातील लोकांना केली आहे. 

गरिबांना मोफत धान्य देण्याच्या उपक्रमाची सुरवात कर्वेनगरमध्ये झाली असून, त्यातर्गत बाराशे कुटुंबांना किराणा साहित्य देण्याचे बराटे यांचे नियोजन आहे. कोरोना आणि त्यानंतरच्या 'लॉकडाऊन'मुळे हातावर पोट असलेल्यांची पंचाईत झाली आहे. रोजगार थांबल्याने चूल कशी पेटवायची? या चक्रात ही मंडळी अडकली आहेत. अशा कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यापाठोपाठ राजकीय मंडळींनीही आपापल्या प्रभागातील लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. 

मात्र, अशा उपक्रमांमुळेही गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. तेव्हा, गरिबांना मदत करतानाच सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेत, बराटेंनी घरपोच धान्य वाटप करण्याची योजना आखली. हे साहित्य घेण्यासाठी लोक घराबाहेर येणार नाहीत, हा विचार करीत 'मिस्ड कॉल किंवा फोन करा'; काही मिनिटांत तुम्हाला साहित्याचे पाकिट मिळेल,' असा शब्दही बराटेंनी दिला आहे.

याबाबत बराटे म्हणतात, "रोजंदारीवर घर चालविणाऱ्यांना आता मदतीचा गरज आहे. सध्याच्या स्थितीत पटकन सुधारणा होईल, याची शक्यता कमी असल्याने पुढचे काही दिवस अशा कुटंबातील लोकांना आधार देण्यासाठी माझा उपक्रम आहे. त्यातून १२०० कुटुंबांना किमान १० ते १२ दिवस पुरेल इतके साहित्य देत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com