कोतवाल, पोलीस पाटीलांचाही विमा काढा : भाजप खासदार उन्मेश पाटील

कोरोना लाॅकडाऊनच्या काळात झटणारेकोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सर्वच महसूल व आरोग्य विभाग तसेच पोलीस कर्मचारी, व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा २५ लाख रुपये रकमेचा विमा उतरवावा,अशी आग्रही मागणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे
BJP MP Unmesh Patil Demands Insurance Cover to Police Patils
BJP MP Unmesh Patil Demands Insurance Cover to Police Patils

जळगाव : कोरोना विषाणू 'कोविड १९' या आजाराशी लढा देण्यासाठी झटणाऱ्या डॉक्‍टर, नर्सेस, आशा स्वयंसेविका व संबधित घटकांचा ज्या पद्धतीने केंद्र सरकारने ५० लाख रुपये रकमेचा विमा उतरविला आहे. राज्य सरकारने याच पद्धतीने राज्यातील कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सर्वच महसूल व आरोग्य विभाग तसेच पोलीस कर्मचारी, व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा २५ लाख रुपये रकमेचा विमा उतरवावा, अशी आग्रही मागणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

लॉकडाऊन काळात कोरोना विषाणू या आजारावरील संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या सर्व सरकारी घटकांसह सेवा देणारे स्वयंसेवक यांचा देखील २५ लाख रुपये रकमेचा विमा उतरविण्यात यावा, असेही त्यंनी म्हटले आहे. 

याबाबत पाठविलेल्या पत्रात खासदार उन्मेश पाटील म्हणतात, "विशेषतः राज्यात जिल्हा बंदी असल्याने पोलीस प्रशासनाने आहे त्या पोलीस बळाचा वापर करत जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे व गावपातळीवर वित्त आयोगाच्या निधीतून गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या एक लाख ७० हजार कोटी रकमेच्या पॅकेज मधील मदत संसर्ग टाळण्यासाठी जनतेला घरपोच सेवा देण्याकरिता महसूल विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. या सर्व घटकांनी आपला जीव धोक्‍यात घालून कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. या करीता या सर्व घटकांचा केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने २५ लाखांचा विमा उतरविण्यात यावा.''

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचा ५० लाख रुपये रकमेचा विमा उतरविण्याचे धोरण स्वीकारले या बद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे .


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com