शरद पवारांनी काय केलं, असं विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या : कोल्हे

शरद पवारांनी काय केलं, असं विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या : कोल्हे

मंचर : "बाहेरच्या कुणाही उपऱ्यांनी आमच्याकडे येऊन छाताडावर उभे राहून शरद पवार साहेबांनी काय केलं. असे विचारले जाते. त्यांना या निवडणुकीत सडेतोड उत्तर देण्याचे काम जनतेने करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

राज्यातील अनेक धरणे, औद्योगिक वसाहती व अन्य विकास कामात पवारांचे असलेले योगदान जनता विसरणार नाही. भाजप- शिवसेना युतीच्या सरकारवर व मंत्र्यांवर जनतेत मोठी चीड आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. बेरोजगारी व महागाई वाढत चालली आहे. आता यांनाच विचारा कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र'' अशी खरमरीत टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

 मंचर (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या महानिर्धार विजयी मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलत होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

 डॉ. कोल्हे यांनी राज्य व केंद्र सरकारचे अक्षरक्षः वाभाडे काढले. ते म्हणाले, "राज्यातील ७५ विधानसभा मतदार संघ पिंजून काढले. त्यावेळी युवक, महिला, शेतकरी यांचा शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसला भरघोस पाठींबा पाहून माझाही उत्साह वाढला. शिवसेना- भाजप युतीचे कोठेही पारदर्शक काम दिसत नाही. सोळा मंत्र्यांची २२ प्रकरणे काढली आहेत. त्यामध्ये ९० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालाय. पण मुख्यमंत्री त्यांना क्लीन चीट देतात हे दुर्दैव आहे. हि निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. त्यामुळे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी मला पुन्हा सभा घेण्याची गरज नाही. कारण शाश्वत विकास म्हणजे वळसे पाटील. राज्यात विक्रमी मताधिक्याने येणाऱ्या उमेदवारात वळसे पाटील यांचा समावेश आहे.''

वळसे पाटील म्हणाले, "विरोधक विचारतात वळसे पाटील यांनी काय विकास केला. डिंभे धरण, बंधारे, कालवे, वीजउपकेंद्र, रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा हि कामे झाली. भीमाशंकर कारखाना, गोवर्धन प्रकल्प, मोरडे फुड्स, जिल्हा बँक, दुध संघ, शरद बँक यांच्या माध्यमातून सहा हजार जणांना हक्काचा रोजगार मिळाला. कलमोडी धरणाचे पाणी वेळनदीत सोडले जाईल. म्हाळसाकांत योजनेद्वारे लोणी धामणी व धरणातून आदिवासी भागातील शेतीसाठी जलसिंचन योजना राबविल्या जातील. रांजणगाव येथे ३०० खाटांचे हॉस्पिटल, जेष्ठ नागरिक, अल्प संख्यांक व युवक, युवतींच्या हिताचे निर्णय घेऊ. सहा निवडणुकात वाढत्या मताधिक्याने जनतेने निवडून दिले. या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने मला विजयी करण्यासाठी मला जनतेने साथ द्यावी."

यावेळी आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यकांत पंलांडे, राम कांडगे, देवेंद्र शहा, देवदत्त निकम, मानसिंग पाचुंदकर, विवेक वळसे पाटील, विश्वास कोहकडे, सुभाष मोरमारे, पूर्वा वळसे पाटील, राजू इनामदार, विष्णू हिंगे, अल्लू इनामदार, प्रभाकर बांगर, शरद शिंदे उपस्थित होते. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com