girl may become sp tejaswi satpute | Sarkarnama

मुलींनो..तुम्हीही एसपी होऊ शकता : तेजस्वी सातपुते

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 मार्च 2019

सातारा : . समाजात 50 टक्के महिला घटक आहेत. त्या महिलांचे ऐकायला पोलिस स्टेशनला महिला अधिकारी हव्यातच. मुलींची स्पर्धा परिक्षेला बसण्याची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे मत साताऱ्याच्या नुतन एसपी तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले. 

महिला दिनानिमित्त सकाळच्या सातारा कार्यालयात गेस्ट एडीटर म्हणून त्यांनी आज काम पाहिले. त्यानिमित्ताने त्यांच्याशी यीन च्या युवती व तनिष्का गटातील महिलांनी संवाद साधला. युपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आयपीएस अधिकारी होताना मुलींनी नेमके काय करावे, याविषयीच्या प्रश्‍नावर त्यांनी मार्गदर्शन केले. 

त्या म्हणाल्या, आयपीएस अधिकारी हे महिलांसाठीचे क्षेत्रच नाही, हा खुप मोठा गैरसमज आहे. मुळात एक महिला आयपीएस अधिकारी आहे एवढी महिला सुरक्षित असूच शकत नाही. तुम्ही एसपी म्हणून बसलाय हीच मोठी सुरक्षितता आहेआ

यएएस, आयपीस अधिकारी व्हायचे असेल तर ज्यांच्याकडे क्वालिटी आहे, त्यांनीच जावे. मुळात मुलींच्यात क्षमता असते, त्या हुशार असतात पण त्यांना या स्पर्धापरिक्षेंपर्यंत जाता येत नाही. त्यामुळे आयएएस परिक्षेच्या निकालात महिलांची संख्या कमी दिसते.

त्यामुळे इच्छा असूनही मुलींना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळत नाही. मुळात मुली पोलिस अधिकारी हे स्वत:साठीचे क्षेत्र आहे, म्हणून त्याकडे पहात नाहीत. त्यामुळे मुलींची संख्या कमी दिसते. त्यामुळे एमपीएससी व युपीएससी परिक्षेला मुली कमी बसतात. 

मुलींमध्ये जीवतोडून कष्ट करण्याची क्षमता असते, धग असते की अधिकारी होण्याची संधी वाया जाऊ द्यायची नाही. एकुण 164 आयपीएस अधिकारी होत्या त्यापैकी आम्ही आठच मुली होतो. इतका टक्का कमी आहे. मुळात युपीएसीमध्ये महिलांना आरक्षण नाही. तेथे आरक्षण असावे असे ही मला वाटत नाही. मुलींमध्ये क्षमता नाही म्हणून संख्या कमी आहे, असे नाही. मुळात मुली परिक्षेलाच कमी बसतात. मुले लाखोंच्या संख्येने परिक्षेला बसतात, त्यातुलनेत मुलींची संख्येने कमी बसतात. त्यामुळे अंतिम निकालात मुली कमी दिसतात. 

मिरा बोरवणकर ज्यावेळी डीजी झाल्या त्यावेळी मी एसीपी होते. माझ्यापासून मिरा मॅडमपर्यंत केवळ 22 आयपीएस अधिकारी होत्या. मुळात पोलिस अधिकारी होणे हे महिलांसाठीचे क्षेत्र नाही, हा खुप मोठा गैरसमज निर्माण केलेला आहे. मुळात आयपीएस एवढी महिला सुरक्षित असूच शकत नाही. तुम्ही एसपी म्हणून बसलाय या मोठी सुरक्षितता आहे. समाजात 50 टक्के घटक महिला आहेत. त्या महिलांचे एकायला पोलिस स्टेशनला महिला अधिकारी हव्यातच. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख