`नागपुरात सुषमांनी मंचावरुन उतरुन घेतली होती आशादेवींची गळाभेट'

सुषमाजींसोबत आमचे घरोब्याचे संबंध होते. नागपुरात आल्या की त्या बरेचदा आमच्या घरी राहायच्या. विशेष म्हणजे माझ्या आईसोबत त्यांचा विशेष स्नेह होता. 2014 मध्ये चिटणीस पार्कवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सभेत मंचावरुन उतरुन त्यांनी माझी आई आशादेवी बच्छराज व्यास यांची गळाभेट घेतली होती. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माझ्या घरातील एक सदस्य आमच्यातून गेला असल्याची भावना विधानपरीषद सदस्य गिरीष व्यास यांनी व्यक्त केली.
`नागपुरात सुषमांनी मंचावरुन उतरुन घेतली होती आशादेवींची गळाभेट'

नागपूर - सुषमाजींसोबत आमचे घरोब्याचे संबंध होते. नागपुरात आल्या की त्या बरेचदा आमच्या घरी राहायच्या. विशेष म्हणजे माझ्या आईसोबत त्यांचा विशेष स्नेह होता. 2014 मध्ये चिटणीस पार्कवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सभेत मंचावरुन उतरुन त्यांनी माझी आई आशादेवी बच्छराज व्यास यांची गळाभेट घेतली होती. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माझ्या घरातील एक सदस्य आमच्यातून गेला असल्याची भावना विधानपरीषद सदस्य गिरीष व्यास यांनी व्यक्त केली. 

चिटणीस पार्कवर लोकसभा निवडणुकीसाठी नितीनजींच्या जाहीर सभेसाठी सुषमाजी नागपुरात आल्या होत्या. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी माझी आई चिटणीस पार्कवर आली होती. तेव्हा आई 92 वर्षांची होती. सुषमाजींचे पार्कवर आगमन झाले आणि त्या मंचावर चढल्या. तेव्हा त्यांना आई आली असल्याचे समजले, त्या तडक मंचावरुन खाली उतरल्या आणि आईला नमस्कार केला व गळाभेट घेतली.

यावेळी जुन्या आठवणी काढून काही वेळ दोघींनीही छान गप्पा मारल्याची आठवण आमदार व्यास यांना सांगितली. उत्कृष्ठ वक्‍त्या आणि भाजपच्या अग्रणी फळीतील नेत्या आमच्यातून निघून गेल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com