कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे लोक सकाळी शपथा घेतात, सायंकाळी भाजप प्रवेशासाठी फोन करतात - गिरीष महाजन

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे लोक सकाळी शपथा घेतात, सायंकाळी भाजप प्रवेशासाठी फोन करतात - गिरीष महाजन

नाशिक : महाराष्ट्रात दोन्ही कॉंग्रेस म्हणजे विरोधी पक्ष सध्या व्हेंटीलेटरच्याही पलिकडे गेला आहे. मी पक्षात राहिन अशा त्यांना शपथा घ्याव्या लागतात. सकाळी ते शपथा घेतात व सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश द्या असा मला फोन करतात. प्रत्येकाला भाजपमध्ये यावेसे वाटते आहे. कारण त्यांचे भविष्य फक्त इथेच आहे असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे बोलताना सांगितले. 

अतिवृष्टी आणि पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज गिरीश महाजन आज येथे आले होते. यावेळी ते म्हणाले, गुलाबराव देवकर, सुरेश जैन हे तर माजी आमदार आहेत. त्यांना भाजपमध्ये यायचे आहे. एकंदर पन्नास विद्यमान आमदार व अन्य माजी आमदार, पदाधिकारी अशा 83 जणांना भाजपमध्ये यायचे आहे. तशी यादी माझ्याकडे आहे. माझा रोजचा अर्धा वेळे त्यातच जातो आहे. विरोध पक्ष अतिशय नाजुक अवस्थेत पोहोचला आहे. व्हेंटीलेटरवर नव्हे तर त्याही पलिकडे त्यांची स्थिती झाली आहे. 


ते पुढे म्हणाले, या पक्षातील लोकांना शपथा घ्याव्या लागत आहेत की आम्ही याच पक्षात राहू. सकाळी हे लोक शपथा घेतात अन्‌ सायंकाळी, "माझे काही होईल का? पक्षात प्रवेश मिळेल का?' असा मला फोन करतात. सगळ्यांना भारतीय जनता पक्षात यायचे आहे. कारण त्यांना माहिती आहे त्यांना केवळ भाजपमध्येच भवितव्य आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष दोन-दोन महिने भेटत देखील नाही. त्यामुळे हा पक्ष भरकटलेला आहे. मी खात्रीने सांगतो त्यांचे चाळीस आमदार सुध्दा निवडून येणार नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com