गिरीश महाजनांनी येथे अजितदादांवरही मात केली..

....
girish-mahajan-visit-hospit.
girish-mahajan-visit-hospit.

जळगाव : सकाळी लवकर उठून राजकीय नेत्यांनी कामाला लागले पाहिजे हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मंत्री भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक'व माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही आमलात आणला. आपल्या मतदारसंघातील रूग्णालयाची सकाळी सात वाजताच पाहणी केली. त्या ठिकाणी अस्वच्छता दिसताच त्यांचा संताप झाला. परंतु तातडीने तोंडाला मास्क लावून हाती झाडू घेवून रूग्णालय स्वच्छ करण्यास सुरूवात केले अन मग काय सोबत आलेले कार्यकर्तेही कामाला लागले.

अजितदादा केवळ भेट देऊन पाहणी करतात. मात्र महाजन यांनी स्वतः एक पाऊल पुढे टाकले.

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन हे सर्वाच्या मदतीला नेहमीच धावून जातात ते कधी रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वत: ट्रक चालवून रस्ता मोकळा करतात तर कधी स्वत:ट्रॅक्‍टर चालवत नदीवर जातात, कधी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना आपल्या वाहनात घेवून रूग्णालयात दाखल करतात.

आज तर त्यांनी आपल्या जामनेर येथील रूग्णालयात चक्क हातात झाडू घेवून साफसफाई केली.मात्र राजकीय नेत्यांनी सकाळी लवकर उठून जनतेत मिसळण्याचा राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मंत्रही त्यांनी आमलांत आणला. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी नाशिक येथे सकाळी सात वाजताच अिंधकाऱ्यांची बैठक घेतली होती.

गिरीश महाजन आज सकाळी सात वाजताच जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात गेले, या ठिकाणी पाहणी करीत असतांना त्यांना सर्वत्र अस्वच्छता दिसून आली.ज्या ठिकाणी रूग्ण येतात त्याच ठिकाणी अस्वच्छता असेल तर रोग बरा होण्याऐवजी तो अधिकच फैलावणार अशी भिती व्यक्त करीत त्यानीं संताप व्यक्त केला. त्यानंतर कोणालाही काही न सांगता तोंडाला मास्क लावून रूग्णालयाची साफसफाई सुरू केली.त्यावेळी सोबत आलेले कार्यकर्तेही स्वच्छता करण्याच्या कामास लागले. त्यांनी संपूर्ण रूग्णालयाची स्वच्छता केली.

यावेळी यावेळी जामनेर तालुका शिक्षणसंस्थेचे सचिव जितु पाटील,भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,गटनेते डॉ प्रशांत भोंडे,आतीष झाल्टे,सुहास पाटील,प्रफुल महाजन,प्रा शरद पाटील,उल्हास पाटील, मुख्याधिकारी राहुल पाटील,डॉ विनय सोनवणे,डॉ हर्षल चांदा,डॉ आर के पाटील,डॉ जयश्री पाटील,डॉ वैशाली चांदा,नितीन झाल्टे आदींसह सर्व नगरसेवक, पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरीक आदींनीही साफ-सफाईत उत्साहाने आपला सहभाग नोंदविला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com