Girish Mahajan took review of Isolation ward in Jalgoan | Sarkarnama

डाॅ. गिरीश महाजनांनी घेतला 'आयसोलेशन' वाॅर्डचा आढावा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना संदर्भातील आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला काय उपाययोजना असू शकतात या संदर्भात आढावा आमदार व माजी मंत्री डाॅ.गिरीश महाजन व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, डीन भास्कर खैरे यांनी वैद्यकीय महाविद्यालय येथे येऊन घेतला

जळगाव : कोरोना संदर्भातील आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला काय उपाययोजना असू शकतात या संदर्भात आढावा आमदार व माजी मंत्री डाॅ.गिरीश महाजन व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, डीन भास्कर खैरे यांनी वैद्यकीय महाविद्यालय येथे येऊन घेतला.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेला असून या वार्ड मध्ये वा तात्काळ व्हेंटिलेटरची व्यवस्था व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत सूचना आमदार गिरीश महाजन यांनी दिल्या दिल्या. या करिता आवश्‍यक ती आर्थिक मदत स्वतःहुन देण्याची तयारी दाखवली. तसेच रोटरी गोल्ड कल्ब अध्यक्ष नंदू आडवानी यांना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सी एस आर च्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले जिल्हाभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करण्यात येईल याची चर्चा यावेळी झाली

"वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी वार्ड सुरू करण्यात आलेला आहे 20 खाटाचा स्वतंत्र अध्यावत असा वार्ड तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी आज एक करूनच संशयित रुग्ण दाखल करून घेण्यात आलेला आहे त्याच बरोबर जिल्ह्यातील येणाऱ्या रुग्नासाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग स्वतंत्रपणे सुरू करण्यात आला असून त्याठिकाणी आज जवळजवळ दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व जूनियर्स डॉक्‍टर्सना ट्रेनिंग देण्यात आलेला आहे. त्यांना ट्रीटमेंट प्रोटोकॉल समजावून सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबर डॉक्‍टर आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची याबाबतीत त्यांना माहिती देण्यात आली आहे,'' असे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टर भास्कर खैरे यांनी यावेळी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख