Girish Mahajan Should Not Interfere in Jalgaon says Anil Gote | Sarkarnama

गिरीश महाजनांनी धुळ्यात लुडबूड करू नये- अनिल गोटे

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

गणेश चतुर्थीनिमित्त नितीन गडकरी आज नागपुरात आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी नागपूर गाठले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना गोटे यांनी ही सदिच्छा भेट होती. नागपुरात काही कामानिमित्त आलो होतो. त्यामुळे नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचे सांगितले.

 नागपूर : भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज सकाळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात अचानकपणे भेट घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. 

गणेश चतुर्थीनिमित्त नितीन गडकरी आज नागपुरात आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी नागपूर गाठले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना गोटे यांनी ही सदिच्छा भेट होती. नागपुरात काही कामानिमित्त आलो होतो. त्यामुळे नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचे सांगितले. या भेटीमागे काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या वादाची पार्श्‍वभूमी असल्याचे बोलले जात आहे. 

या संदर्भात छेडले असताना आमदार गोटे म्हणाले, ''गिरीश महाजन यांच्या विरोधात यापूर्वीच पत्रक काढले आहे. महाजन यांनी जळगाव जिल्हा सांभाळावा. धुळ्यात नगरपालिका माझ्या नेतृत्वात निवडू आलेली आहे. भाजपला एवढे यश मिळाल्यानंतर गिरीश महाजन यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. त्यांनी आपल्या जळगाव जिल्ह्यात राजकारण करावे."

गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन असल्याचे बोलले जात आहे. धुळ्यात आमदार अनिल गोटे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्यावर धुळ्यातील राजकारणाची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आमदार गोटे यांनी नागपुरातील 'वाडा' गाठल्याचे समजते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख