गिरीश महाजन पुन्हा बोलले, निवडणूकीनंतर देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री  !

..
girish_mahajan_.jpg
girish_mahajan_.jpg

जळगाव : राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की  शिवसेनाचा असा वाद सुरू असतांनाच राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद भंपकडेच राहणार आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे जाहीर केले आहे . गेल्या आठवड्यात गिरीश महाजन यांनी असेच विधान केल्याने शिवसेना नेत्यात नाराजी पसरली होती . 
त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप- शिवसेना आमदारांची बैठक घेऊन अशी वादग्रस्त विधाने करू नका असे सांगितले होते . त्यांनतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन पुन्हा मुख्यमंत्री पदाबाबत जाहीरपणे बोलले आहेत . 

 केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले त्या प्रमाणे राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हिच इच्छा आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीनंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनतील हे निश्‍चित आहे. असे राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी जळगाव येथे पक्षाच्या बैठकीत बोलतांना व्यक्त केले. यावेळी पक्षाचे नेते एकनाथराव खडसे उपस्थित होते. 

जळगाव येथील ब्राम्हण सभेत भाजपची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.संजीव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी महसूलमंत्री भाजप नेते एकनाथराव खडसे, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ, संजय सावकारे आदी उपस्थित होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com