खान्देशात भाजप हाऊसफुल्ल : गिरीश महाजन

girish_mahajan.
girish_mahajan.

जळगाव  :  राज्यात कोकण, मुबंईत इतर पक्षाचे कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत असले तरी खानदेशात मात्र आता कोणीही प्रवेश करणार नाही. खान्देशात  आता आमच्या कडे जागाच नाही भरती फुल्ल झाली आहे . काही जणांनी आमच्याकडे विचारणा केली होती.परंतु आता कोणतीही भरती होणार नाही,  असे राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी  स्पष्ट केले.  


राज्यातील युतीच्या जागा वाटपात मित्र पक्षांना 18 ते 20 जागा देण्यात येतील. उर्वरीत जागावर भाजप-सेनेत वाटप होईल. मात्र सद्य स्थितीत असलेल्या जळगावसह 123 जागावर भाजप निवडणूक लढविणार आहे. त्यात कोणतेही बदल होणार नाही असे मत श्री. महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले. 

जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार सौ.स्मिता वाघ उपस्थित होते.यावेळी बोलतांना महाजन म्हणाले, जागावाटपाबाबत भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील हेच निर्णय घेतील. त्यांची शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे.

मात्र राज्यातील 123 जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार असून त्या जागा आम्ही लढणार आहोत . जळगाव शहरातूनही भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार राहणार आहे.जागा वाटपात आम्ही मित्र पक्ष रासप, शिवसंग्राम, रिपाई (आठवले गट) यांना 18 ते 20 जागा देणार आहोत, त्यांनीही या जागावर समाधान व्यक्त केले आहे. मित्र पक्षाच्या या जागा सोडून आता आमच्या दोन्ही पक्षात जागावाटपाबाबत चर्चा होईल. त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्‍न आता निकाली निघाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com